अहमदनगर : ‘कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा अपिलात कायम
अहमदनगर : आरोपी नामे निलेश कृष्णा फल्ले रा. पाटील गल्ली, भिंगार ता. जि. अहमदनगर यास अहमदनगर येथील मा. जिल्हा न्यायाधीश क. ३ निरंजन आर. नाईकवाडेसाहेब यांनी हुंडयासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी भा.द.वि. कलम ४८९ (अ) नुसार दिलेली एक वर्ष सक्त मजुरी व ५,०००/- दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा अपिलामध्ये कायम केली. सदरच्या अपिलात सरकारपक्षाचे वतीने अति तथा विशेष सरकारी वकील श्रीमती अॅड. मनिषा पी. केळगंद्रे- शिंदे यांनी काम पाहिले. सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि, याबाबत सविस्तर माहिती की, दि. ११.०५.२०१३ रोजी फिर्यादी महिलेने फिर्याद दिली की, दि. १८.११.२०११ रोजी फिर्यादी हिचे अपिल दाखल करणार आरोपी सोबत लग्न झालेले होते. लग्नानंतर २-३ महिने तिला चांगले नांदविण्यात आले. परंतु त्यानंतर आरोपी नं. १ हा त्याचे इनकम टॅक्स ऑफिससाठी फिर्यादीस माहेरावरून दोल लाख रूपये आणावेत म्हणून तिला त्रास दयायला सुरूवात केली. तसेच आरोपी व त्याचे घरातील फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण करू लागले. दि.०५.०३.२०१२ रोजी फिर्यादीचे वडिल यांनी आरोपीच्या वडिलांना फोन करून घरी आले असता त्यांनी देखील आरोपी यांनी दोन लाख रूपयाची मागणी करून शिवीगाळ व धमकी दिली की, जर पैसे दिले नाही तर फिर्यादीस सासरी नांदू देणार नाही. त्यावेळी फिर्यादीचे वडिलांनी आरोपी यांना समजावून सांगितले की, माझी आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यावर आरोपी यांनी फिर्यादीस तिचे अंगावरील कपडयांसह घरातून हाकलून दिले. त्यामुळे फिर्यादी ही माहेरी राहु लागली. दरम्यान सहा महिने झाल्यानंतर नातेवाईकांनी आरोपी यांना समजावून सांगितले तसेच अप्पर पोलीस अधिक्षक यांचे सांगण्यावरून फिर्यादीस पुन्हा सासरी नांदायला गेली.
दि.०९.०५.२०१३ रोजी आरोपी फिर्यादी हिंस ओम शांतीच्या कार्यक्रमास जाण्यासाठी माहेरवरून घेवून आले. फिर्यादीस सासरी घेवून आलेनंतर पुन्हा आरोपी व इतर फिर्यादीला दोन लाख रुपयांची मागणी करू लागले. तसेच धमकी दिली की, जर पैसे दिले नाही तर नांदू देणार नाही. त्यानंतर अपिल करणार आरोपी निलेश फल्ले हा फिर्यादीचे छातीवर बसुन फिर्यादीला मारहाण केली. आरोपी हे फिर्यादीस वेडी म्हणत होते तसेच तिला डॉ. झालानी हॉस्पिटल यांचेकडे अॅडमिट केले. डॉक्टरांनी फिर्यादीचे वडिलांना बोलावून घेतले. यावेळी फिर्यादीची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे तिला सिव्हील हॉस्पिटल येथे अॅडमिट केले तेथे फिर्यादीने आरोपी अपिल करणार याचेसह त्याचे घरातील इतर व्यक्तीविरुद्ध गुन्हयाची माहिती दिली. सदर बाबत गुन्हयाची नोंद होवून साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. आरोपींविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने मे. कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
केसमध्ये फिर्यादी, तिचा भाऊ, मामा तसेच तपासी अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात आली. सदरच्या केसचा दि.०९.०१.२०१८ रोजी निकाल होवून आरोपी क.१ निलेश कृष्णा फल्ले (अपिल दाखल करणार) यास मा. न्यायालयाने भा.द.वि. कलम ४९८ (अ) नुसार दोषी धरून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. तसेच इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
सदर फौजदारी अपीलामध्ये आरोपी व सरकार पक्षाचा युक्तीवाद होवुन कनिष्ठ न्यायालयाने
दिलेली वरिलप्रमाणे शिक्षा कायम ठेवली. सदरच्या अपिलाचे कामकाज अभियोग पक्षाच्या वतीने अँड मनिषा पी.
केळगंद्रे- शिंदे यांनी पाहीले. त्यांना पैरवी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी सहकार्य केले.
अहमदनगर ता. २१/०७/२०२३
( अॅड. मनिषा पी. केळगंद्रे- शिंदे) विशेष सरकारी वकील, अहमदनगर. मो. ९८५०८६०४११८२०८९९६७९