बिंगो जुगार आणि मटका अड्ड्यांवर कोतवाली पोलिसांची जोरदार कारवाई
एक लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त ; १३ जणांवर गुन्हा दाखल
नगर :::: कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका तसेच बिंगो जुगार अड्ड्यांवर कोतवाली पोलिसांनी छापेमारी करून तेरा जणांवर कारवाई केली आहे. एक लाख ४५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटल, अमरधाम गेट जवळ नालेगाव, आशा टॉकीज चौक, पिंजार गल्ली, पुणे बसस्थानक स्वस्तीक चौक, माळीवाडा वेस, लोखंडी पुल रेल्वे स्टेशन या ठिकाणी कल्याण मटका व बिंगो जुगार चालविणाऱ्या व खेळणाऱ्या तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मटका जुगार खेळविणाऱ्या मंगेश विजयसिंह तवर (वय ४०, रा. हातमपुरा अहमदनगर), गौरव गोकुळ चौधरी (वय ३२ रा. कायनेटिक चौक अहमदनगर), रुपेश ज्ञानदेव धुमाळ (वय ३५, रा. शिवाजीनगर कल्याण रोड), प्रकाश श्याम सूर्यवंशी (वय ४३, रा. वाघ गल्ली अहमदनगर), सचिन अशोक पाटेकर (वय ३२ कोठी अहमदनगर) विनोद बबनराव शेटे (वय ५३, रा. वंजार गल्ली, अहमदनगर) मंगेश हिरामण भोसले (वय ३६, रा. जहागीरदार चाळ, अहमदनगर) आणि जुगार खेळणाऱ्या प्रफुल्ल नारायण लोटके (वय ५८, रा. तोफखाना अहमदनगर), राजेंद्र हरिभाऊ पुराणे (वय ३२ रा. केडगाव अहमदनगर), नाना टाकाप्पा काटकर (वय ४५, रा. तोफखाना अहमदनगर), कृष्णा पुरुषोत्तम साहू (वय २३, रा. झेंडा चौक केडगाव) अशा ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, बिंगो जुगार चालविणाऱ्या
नवनाथ शिवाजी काळे (रा.येळपणे, ता.श्रीगोंदा), शुभम बाबासाहेब काळे (रा. येळपणे, ता. श्रीगोंदा) या दोघांवर हातमपुरा परिसरात कोतवाली पोलीसांनी कारवाई केली आहे. दोन्ही कारवाईत टीव्ही, लॅपटॉप व इतर साहित्य असा एक लाख ४५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला , अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई मनोज कचरे, पोलीस अंमलदार सतिश भांड, तनविर शेख, गणेश धोत्रे , योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, सलिम शेख रविंद्र टकले, अभय कदम, संदिप थोरात , अमोल गाढे , सुजय हिवाळे , कैलास शिरसाठ , सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे, श्रीकांत खताडे, अनुप झाडबुके, सचिन लोळगे, संतोष जरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.