अहमदनगर शहरामध्ये मनसे मधील गटबाजी चव्हाट्यावर…
मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या स्वागताच्या होर्डिंग फ्लेक्स बोर्डवर मनसे नेते नितीन भुतारे यांचा फोटो गायब
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात दि. 22 जुलै शनिवार रोजी महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे अहमदनगर शहरात येणार असून त्यांचे स्वागताचे होर्डिंग फलक फ्लेक्स बोर्ड जाहिराती अनेक ठिकाणी शहरात लागलेल्या दिसून येत आहे. परंतु हे सर्व असताना नगर शहरातील नगर जिल्ह्यातील गटबाजी उफाळून आल्याचे चित्र या फलकांच्या माध्यमातून होल्डिंगच्या माध्यमातून दिसत आहे. यामध्ये जिल्ह्यातील धडाडीचे नेते नितीन भुतारे यांनी अनेक वेळा मनसेच्या माध्यमातून अनेक आंदोलने मोर्चे केलेले असून पक्षाच्या शहरांमध्ये वाढणीसाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले असून त्यांनाच डावलण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी नगर शहरात गटबाजीचे दर्शन घडत आहे. गटबाजी उफाळून आल्याचे दिसत आहे. नगर शहरात सर्वसामान्यांना ओळखीचे असणारे नितीन भुतारे यांना जाहिरात होर्डिंग फलक फ्लेक्स बोर्ड तसेच वृत्तपत्राच्या बातम्यांमधून वगळून लावल्यामुळे नगर शहरात चर्चा सुरू आहे. याचा कुठेतरी फटका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसण्याची चित्रे दिसत आहेत. त्यामुळे या गटबाजीकडे अमित ठाकरे हे कशा पद्धतीने पाहतात हे पाहणे गरजेचे आहे