आर्किटेक्टस, इंजीनिअर्स अँड सर्व्हेअर्स असो. च्या वतीने इंजीनिअर्स डे निमित्त विविध कार्यकार्माचे आयोजन…
नगर – आर्किटेक्टस, इंजीनिअर्स अँड सर्व्हेअर्स असो. अहमदनगर हि संस्था मागील ३६ वर्षापासून अहमदनगर शहरामध्ये कार्यरत असून, हि संस्था सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविते. त्याच बरोबर विविध टेकनिकल, मार्केटिंग, शैक्षणिक, तांत्रिक, फॅमिली गेट टुगेदर, कौटुंबिक सहल, शॉप व्हिजीट आणि सामाजिक उपक्रमही सभासदांसाठी राबवीत असते. तसेच महापालिका, टी पी कार्यालय आणि बांधकामाशी संबंधित सर्व विभागात सभासदांना येणाऱ्या अडचणीसाठी एकत्रित येऊन काम करते. सरकारी जी. आर नियमावली, तसेच मार्केट मध्ये नव्याने येणारे तंत्रज्ञान याविषयी सभारादांना कार्यशाळेच्या माध्यमातून अवगत करत असते. संस्थेचे ५०० सभासद असून संस्थेतील सभासद नगर शहर, जिल्हा तसेच राज्य आणि देशामध्ये बांधकाम व्यवसाय करतात. शहराच्या सौन्दर्या मध्ये भर घालण्याचे, बिल्डींग प्लानिंग आणि बांधकामातून आर्किटेक्ट आणि इंजीनिअर्स करतात. तसेच शहराच्या नियोजनबद्द विकासामध्ये संस्थेच्या सभासदांचा मोठा हातभार असतो. शहर विकासात संस्था महापालिका, टी पी कार्यालय आणि इतर शासकीय विभाग यांना नेहमीच सहकार्य आणि मार्गदर्शन करत असते.अशी माहिती संस्थाचे अध्यक्ष इंजी रमेश कार्ले यांनी दिली यावेळी उपाध्यक्ष आदिनाथ दहिफळे, सचिव प्रदीप तांदळे, संस्थेचे माजी अध्यक्ष अन्वर शेख, सहसचिव प्रथमेश सोनवणे, अविनाश पुरोहित, विशाल येसेकर, आदी उपस्थित आहे.
अध्यक्ष इंजी रमेश कार्ले पुढे म्हणाले कि १५ सप्टेंबर हा भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस पूर्ण देशामध्ये इंजीनिअर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्यांनी देशसेवेसाठी सिव्हील इंजिनिअरींग क्षेत्रात केलेल्या कामाचा गौरव करून भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पदक देऊन सन्मान केला. त्यांच्या कार्याचे स्मरण युवा पिढीने यानिमित्ताने करावे या उद्देशाने दरवर्षी आमची संस्था इंजीनिअर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करते. यासाठी या क्षेत्रात काम केलेल्या दिग्गज व्यक्तींना बोलावून त्यांचे मार्गदर्शन आणि सत्कार करत असते. यावर्षी एस आर जे स्टील कंपनी जालना यांचे प्रायोजकत्व संस्थेला याकामासाठी मिळाले असून अतिउच्च दर्जाचे स्टील बनवतात. तसेच त्यांचे महाराष्ट्र राज्यासह पूर्ण देशामध्ये वितरण होते स्टीलची क्वालिटी आणि एस आर जे याची तत्पर सेवा यामुळे त्यांच्या स्टीलला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच त्यांचा बऱ्याच समाज कार्यात आणि सेमिनारच्या माध्यमातून नवीन पिढीतील इंजीनिअर्स घडविण्यात सक्रीय सहभाग असतो.यावर्षी इंजीनिअर्स डे च्या कार्यक्रमास संस्था आणि एस आर जे स्टील जालना यांनी अशोका ग्रुपचे चेअरमन इंजि. अशोक कटारिया, नाशिक यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावले असून एस आर जे स्टीलचे व्हाइस प्रेसिडेंट सेल्स आणि मार्केटिंग श्री. रोहित मानधनी व रीजीनल मॅनेजर श्री अनिरुद्ध पांडे, एरिया सेल्स मैनेजर श्री. अविनाश पुरोहित, ब्रांड प्रमोशन ऑफिसर विशाल येसेकर हे उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे,एडी टी पी चंद्रकांत निकम नगर शाखा, राम चारठाणकर अहमदनगर महानगरपालिका, संजय बारगळ टाऊन प्लानर नगर शाखा, सर्वेश चाफळे टाऊन प्लानर अहमदनगर महानगरपालिका यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.