नगरसेवक मनोज कोतकर यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
दौंड रोड कानेटिक चौक ते विद्या नगर पर्यंतची स्ट्रीट लाईट सुरू होणार – आयुक्त डॉ. पंकज जावळे
नगर – दौंड रोड कायनेटिक चौक ते विद्या नगर पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील स्ट्रीट लाईट गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. महापालिका एम एस ई बी कार्यालय व एन एच आर विभाग यांच्या हस्तंतराच्या वादात हा प्रश्न अडकला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरामध्ये अनेक अपघात होऊन काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे सकाळी या मार्गावरून नागरीक जॉगिंग करत असतात तसेच या परिसरामध्ये सुभद्रा नगर, हनुमान नगर, इंदिरानगर, आव्हाड वीट भट्टी,कायनेटिक चौक, विद्यानगर, शास्त्रीनगर परिसरातील हजारो नागरिक रात्री प्रवास करत असतात. त्यांना या अंधारामुळे विविध समस्याला सामोरे द्यावे लागते.
या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट चे काम मार्गी लागावे यासाठी महापालिकेच्या महासभेमध्ये अनेक वेळा आवाज उठूनही अजून पर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नाही. आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला त्यानुसार त्यांनी देखील एमएसईबी कार्यालय एन एच आर विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला आहे हा राष्ट्रीय महामार्ग नगर शहरातून जात असून या महामार्गावर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहेत. त्यामुळे प्रवाशांना नगरमधून गेल्यासारखे वाटत नाही त्यामुळे आपल्या शहराची बदनामी होत असते . कायनेटिक चौक ते विद्या नगर पर्यंतची स्ट्रीट लाईट सुरू व्हावी यासाठी सतत पाठपुरावा केला आहे त्यानुसार आयुक्त यांनी पाहणी केली असून येत्या आठ दिवसांमध्ये दौंड रस्त्यावरील स्ट्रीट लाईट सुरू होतील असे आश्वासन यावेळी दिले अशी माहिती नगरसेवक मनोज कोतकर यांनी दिली. यावेळी विद्युत विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, विजय शंकरतिवारी, अंबादास शिंदे, तुकाराम तावरे आदी उपस्थित होते.