नाभिक समाजाचा एस सी प्रवर्गामध्ये समावेश करावा यासाठी राज्यभरातील हजारो नाभिकांनी चौथ्या दिवशीच्या आमरण उपोषणास दर्शवला पाठिंबा
नगर : नाभिक समाजाला एसी प्रवर्गा मध्ये समावेश करून घ्यावा यासाठी तपोवन रोड येथील राष्ट्रसंत सेना महाराज मंदिर येथे समाजातील शांताराम राऊत, विकास मदने, शिवाजी दळवी, अरुण वाघ, अजय कदम हे पाच पांडव आमरण उपोषणास बसले आहे. आज चौथा दिवस असून राज्यभरातील हजारो नाभिक समाजातील नागरिकांनी येथे येऊन पाठिंबा दर्शविला आहे. आता एस सी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा यासाठी राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, कै.नाभू संगमवार यांनी एस.सी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे यासाठी पहिला लढा उभारून टेम्पो भर कागदपत्रे शासनाला दिली होती. त्यानंतर अनेक लढे उभे केले, मात्र अजून पर्यंत आरक्षण मिळाले नाही. केंद्र सरकारने अभ्यास करून नाभिक समाजाला एस.सी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची शिफारस केली मात्र महाराष्ट्र सरकारने अजून पर्यंत लागू केले नाही. देशातील चार राज्यांमध्ये आरक्षण लागू झाले आहे. आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा लाभलेला आहे. नाभिक समाजातील दोन तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर काम करून इतिहास रचला आहे. आरक्षणासंदर्भात राज्यकर्त्यांना सर्व माहीत असते की कोर्टात काय टिकते आणि काही टिकत नाही, त्यांना फक्त त्यांच्या खुर्च्या टिकवायचे आहे. नाभिक समाजाची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. दिवसभर कष्ट करून आपली उपजीविका भागवत असतात. समाजातील तरुणांना चांगले शिक्षण मिळून नोकरीमध्ये आरक्षण मिळाले नाही तर समाजामध्ये वाईट परिस्थिती निर्माण होईल आम्हाला एस सी प्रवर्गामध्ये जायचे आहे. आमचा तो अधिकार आहे तो मिळवण्यासाठी आम्ही मोठा लढा उभा करणार आहोत. केंद्र सरकार समान नागरी कायदा आणत असून तो आपल्यासारख्यांना त्रासदायक आहे. याला आपला विरोध असणार आहे. या माध्यमातून आपल्या अधिकारांवर गंडांतर येणार आहे. आजच्या युवकांमध्ये मुस्लिम समाजाबद्दल द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहेत. मुख्य विषयापासून विचलित करून तरुणांची माती भडकवली जात आहे. मुस्लिम समाज हा आपल्या सर्व सुख दुःख बरोबर असतो, आम्ही आता ओबीसी मध्ये आहोत पण आमचा शेवटचा नंबर आहे. देवाने माणसे घडवली त्यांना सुंदर करण्याचे काम नाभिक समाज करत असतो आम्ही दहा दिवस राज्यभरातील दुकाने बंद ठेवली तर काय होऊ शकते हे तुम्हाला दिसेलच, आमच्या पुढच्या पिढीचे नुकसान होऊ देणार नाही. यासाठी मोठा लढा उभारू आता हा लढा नगर शहरातून उभारला असून राज्यभर आंदोलने सुरू होतील. अशी माहिती नाभिक समाजाचे प्रदेश सह सरचिटणीस सयाजीराव झुंजार यांनी दिली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ अहमदनगर शहरातील नाभिक समाजातील कार्यकर्ते शांताराम राऊत, विकास मदने, शिवाजी दळवी,अरुण वाघ, अजय कदम यांनी तपोवन रोड येथील राष्ट्रसंत सेना महाराज मंदिर येथे समाजाला एस.सी प्रवर्गामध्ये समावेश करावा यासाठी आमरण उपोषण सुरू करून आज चौथ्या दिवशी राज्यभरातील बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रदेश सहचिटणीस सयाजीराव झुंजार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत खोसे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक विपुल शेठीया,सांगली जिल्हाध्यक्ष जयंत सूर्यवंशी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब काशीद, शिवबा काशीद, बुलढाणा जिल्हाध्यक्ष मंगेश माळी, कांतीलाल कोकाटे, शामराव पिंपळे, भगवान फुलसौंदर यांनी पाठिंबा जाहीर केला यावेळी आमदार शंकरराव गडाख यांनी पाठिंबाचे पत्र पाठवले आहे. यावेळी राज्यभरातील नाभिक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते