नाभिक समाजाचे आमरण उपोषण पालकमंत्री यांच्या मध्यस्थीने सुटले
मुंबई येथे नाभिक समाजाच्या एस सी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक
30 सप्टेंबर नंतर महाराष्ट्रात सलून दुकान राहणार बंद नाभिक समाजाचा इशारा
नगर : नाभिक समाजाला एसी प्रवर्गामध्ये समावेश करून घ्यावा यासाठी ओपन रोड येथील राष्ट्रसंत सेना महाराज मंदिर येथे समाजातील शांताराम राऊत विकास मदने शिवाजी दळवी अरुण वाघ अजय कदम यांनी गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले होते हे उपोषण सुटावे यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी मध्यस्थी करून लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाभिक समाजाची बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडले यावेळी विकास मदने यांनी सांगितले की जर मुख्यमंत्र्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत बैठकीचे आयोजन केले नाही तर त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सलून दुकान बंद राहणार असल्याचा इशारा यावेळी दिला