संपादकीय…. नगरच्या राजकीय मंडळींकडून गणपतीच्या आरतीची विटंबना
विविध राजकिय मंडळींनी बाप्पांच्या आरतीचा केला अपमान…
मनपा आयुक्तांची आरती करताना केला गणरायाच्या आरतीचा गैरवापर…
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच उत्सवाला गालबोट लागले ?
अहमदनगर शहरात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना मंडप उभारणीच्या मागणीसाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत आयुक्तांना घेराव घातला, दरम्यान मंडप उभारणीच्या मागणीसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मनपा आयुक्तांसमोर गणपतीची आरती केली,,
पण खरंच असं करणे कितपत योग्य आहे, गणपतीची आरती गणपती समोरच सादर करणे महत्वाचे आहे तरच त्याचे महत्व टिकून राहते असते, मात्र असे असताना या गणरायाच्या आरतीचा वापर राजकीय मंडळींनी आयुक्तांसाठी नेमका का केला ? खरंच स्वार्थासाठी इतरांचे लक्ष वेधण्यासाठी हे असं काही तरी विचित्र करण्याची गरज होती का ? गणपती बाप्पाच्या आरतीचा गैरवापर करणे कितपत योग्य आहे, ?
विविध रूपांनी संकटातून वाचवणारा, भाविक भक्तांचे दुःख दूर करणाऱ्या , सर्वांसाठी तारणहार असलेल्या गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी बाप्पांच्याच आरतीची एक प्रकारे नगरच्या विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी विटंबना केल्याचा प्रकार अहमदनगर महानगरपालिकेत घडला, गणेशोत्सव काळात मंडप उभारणीसाठी परवानगी मिळवण्याकरिता विविध अशा किती तरी प्रकारांचा, मार्गाचा अवलंब करून अनोखे आंदोलन करता आले असते, पण तसं न करता या राजकिय मंडळींनी मनपा आयुक्तांसमोर गणपतीची आरती करत या गणरायाच्या आरतीचा मोठा अपमान केला , गणपती बाप्पाच्या आरतीची विटंबना केली गेली असं इथे म्हणायला काही हरकत नाही, गणेशोत्सव काळात केवळ गणेश मंडळांना, भाविक भक्तांसाठी मंडप उभारणीस परवानगी मिळावी यासाठी आयुक्तांची आरती करण्यात आली आणि त्यासाठी गणपतीच्या आरतीचा वापर करण्यात आला, ही खरंच लाजिरवाणी बाब आहे, या प्रकारामुळे अनेक गणेश भक्तांच्या भावना तर दुखावल्यातच पण याच बरोबर देव देवतांचाही अपमान होत आहे, त्यांची विटंबना केली जात आहे, याचे थोडेही भान या राजकारण्यांना नसावे का ? खरे तर राजकारणासाठी नगरचे राजकिय मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे तर सर्वांना माहीतच आहे, पण आता हे राजकारणी राजकारणात देव देवतांचाही वापर करत स्वार्थ साधत असल्याचे दिसून येत आहे, कोणत्याही मागणीसाठी अनोखे आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेणे, हे राजकारण्यांना नवे नाही, मात्र नगरच्या राजकिय मंडळींनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या मंडपास परवानगी मिळवण्यासाठी लाडक्या गणरायाच्या आरतीचा चुकीचा वापर केला, यातून त्याची विटंबनेचा, देव देवतांचा अपमान या राजकीय मंडळींनी केला,
गणरायाचाच उत्सव साजरा करण्यासाठी गणरायाच्या आरतीचा अवमान करणं, हा प्रकार म्हणजे या गणेशोत्सवास उत्सव सुरू होण्यापूर्वीच गालबोट लागले आहे, हे मात्र नक्की….
संपादक : आफताब मन्सूर शेख