संपादकीय | Crime Report | अॅबट जोमात , पोलीस कोमात, ताबा प्रकरणावर कोण करेल मात ?
पोलीस प्रशासन गंभीर नसल्याने ताबा प्रकरण जोरात सुरु
ताबा मारण्यासाठी गुंडांना सुपारी देण्यात माहीर ; रवी अॅबट नाव झाले जाहीर
अहमदनगर शहरात अवैधरित्या जमिनीवर ताबा मारण्यासाठी गुंडांना सुपारी देणारा अॅबट जोमात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त…
गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर शहरात ताबा प्रकरण चांगलच गाजत आहे. शहरात अवैधरित्या जमिनीवर ताबा मिळवण्याचे प्रकार सर्रास सुरु असून यात नागरिकांच्या जमिनीवर ताबा मारण्यासाठी मुख्य सूत्रधार रवी अॅबट हा माहीर असल्याची चर्चा सध्या नगरमध्ये सुरु आहे. त्यातच या ताबा प्रकरणातून अनेक वाद विवाद होवून ते वाद विकोपाला जातात आणि त्यातून एकमेकांवर जीवघेणे हल्ले देखील होत आहे,
अहमदनगर शहरात बेकायदा जमिनी खरेदी विक्रीसाठी कागदपत्र, खोटे शिक्के तयार करून, स्टॅम्पवर नकली सह्या अंगठे घेवून, पैशांच्या देवाणघेवाणीतून फसवणूक करत नागरिकांना मानसिक त्रास देत गुंडागर्दी करत गोरगरीब जनतेच्या मोकळ्या जागांवर, घरांवर ताबा मिळवणे, अवैध प्रकारे प्लॉट हडप करणे, जमिनी जागा जबरदस्तीने बळकावल्या जात आहे नगर शहरात आता अनेक ठिकाणी हे प्रकार राजरोसपणे सध्या मोठ्या प्रमाणात सुरु असून एखाद्याची जागा गैरमार्गाने खोटे बनावट कागदपत्र देऊन किंवा मारहाण करत धमकी देऊन बळजबरीने जागा हिसकावून घेण्याचा प्रकार नगर शहरात अॅबट नावाच्या व्यक्तीकडून जोरात सुरु आहे, पण पोलीस प्रशासन याबाबत गंभीर नसल्याने जमिनीच्या ताब्यावरून प्राणघातक हल्ले होताहेत, आणि यात काहींचा जीव देखील गेलाय.
जमिनींवर ताबे मारण्याचे प्रकरण अनेकदा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले मात्र पोलीस याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नगर शहरात रवी अॅबट आणि त्याच्यासारख्या लोकांचे धाडस वाढत आहे, या अशा लोकांमुळे सध्या नगर मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अॅबट जोमात आणि पोलीस कोमात अशी स्थिती असून यावर कोण करेल मात असा प्रश्न निर्माण होत आहे.
तर नगर मध्ये पोलिसांनी ताबा प्रकरणाचा सखोल तपास केल्यास अॅबट सारखे अनेक जण समोर येतील, ताबा प्रकरणात अनेक बांधकाम व्यावसायिक, तरुण वर्ग, राजकीय मंडळी अडकले जात आहे, स्वार्थापोटी आर्थिक हितासाठी असे बेकायदा जागांवर ताबा मिळवण्याचे चालू असलेले प्रकार सर्वांसाठीच घातक आहे, नगर मधील या ताबा प्रकरणाकडे वेळीच लक्ष देत माहिती घेवून पोलिसांनी रवी अॅबट आणि त्याच्यासारख्या लोकांची चौकशी करून सखोल तपास करत पुढील अनर्थ टाळले पाहिजे, आणि असे घातक प्रकार थांबवले पाहिजे अशी मागणी नगरकर करत आहे.
संपादक : आफताब शेख