अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ समाजातल्या गुंडांचा बंदोबस्त करा ; अहमदनगरच्या एसपींकडे निवेदनाद्वारे मागणी
अहमदनगर शहराजवळील भिंगारलगतच्या नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये काही ठराविक समाजातल्या गुंडांकडून स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास दिला जात आहे. चोर आणि दरोडेखोर ओळख असलेल्या या समाजातल्या गुंडांकडून नागरदेवळे हद्दीमधील जमिनीवर अतिक्रमण केले जात आहे. या समाजातल्या महिला देखील स्थानिक ग्रामस्थांना अश्लील शिवीगाळ करत आहेत.
या संदर्भात जाब विचारण्यास गेलेल्या स्थानिक ग्रामस्थांनाच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी या लोकांकडून दिली जाते. त्यामुळे या समाजातल्या गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेख शाकीर अब्दुल गणी यांनी केली आहे. या संदर्भात शेख आणि नागरदेवळे गावातल्या काही स्थानिक ग्रामस्थांनी अहमदनगर यांना निवेदन दिलं आहे.
या निवेदनात म्हटलं आहे, की या समाजातल्या गुंडांकडून मोकळ्या जागेत जनावरे सोडली जाताहेत. त्यांना जाब विचारला असता जनावरे सांगण्यासाठी सोडले आहेत, असं सांगितलं जातं. मात्र जागामालकाने दुर्लक्ष केल्यावर या गुंडांकडून तिथं पाल ठोकले जातं.
जागा मालकाच्या संमतीशिवाय ठोकलेलं पाल काढून टाकण्यासाठी दोन लाख रुपये देण्याची मागणी केली जाते. या समाजातल्या महिलादेखील विवस्त्र होऊन जागा मालकांना अश्लील शिव्या देत आहेत. लहान मुलांना जमिनीवर आपटवून आरडाओरडा करत कायदा आणि सुव्यवस्थेला अडथळा निर्माण करत आहेत.
दरम्यान, जागा मालकाच्या परवानगीशिवाय घुसखोरी करणाऱ्या अशा गुंडांचा बंदोबस्त केला जाईल, अशी ग्वाही भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आलेल्या निवेदनावर जावेद पठाण, साजिद बक्षी, साजिद खान, अभिजीत जोशी, प्रकाश कर्डिले, राकेश ताठे, मकरंद देशमुख, काकासाहेब भोजने, अमोल शिंदे आदींच्या सह्या आहेत.