Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»अहमदनगर ब्रेकींग : मोक्यामधील फरार आरोपींनी केली होती सराफा बाजारात चोरी… सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्सचे दुकान फोडणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंद
    Ahmednagar

    अहमदनगर ब्रेकींग : मोक्यामधील फरार आरोपींनी केली होती सराफा बाजारात चोरी… सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्सचे दुकान फोडणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंद

    newstoday24By newstoday24October 11, 2023No Comments3 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर ब्रेकींग : मोक्यामधील फरार आरोपींनी केली होती सराफा बाजारात चोरी

    सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्सचे दुकान फोडणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंद

    कोतवाली पोलिसांची दमदार कामगिरी; नाशिक मधून दोघांना अटक

    सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ३,३४,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

    हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मोक्याचे गुन्ह्यात फरार आहे अटक आरोपी; त्याचेवर दाखल आहेत १२ गुन्हे

    अहमदनगर : शहरातील मध्यभागी असलेल्या सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्स हे दुकान फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे २४ लाखांचा आवाज लुटणाऱ्या टोळीतील २ आरोपींना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोतवाली पोलिसांची तीन पथके गुन्हा घडल्यापासून सलग आठ दिवस आरोपींच्या मागावर होती. टोळीतील दोन आरोपी रेल्वेने प्रवास करून पळून जाण्याच्या तयारीत असताना धावत्या ट्रेनमध्ये आरोपींचा शोध घेऊन कोतवाली पोलिसांनी आरोपींना नाशिक मधून अटक केली आहे.
    अक्षयसिंग बिरूसिंग जुनी (वय २२ वर्षे, राहणार वैदवाडी, गोसावी वस्ती, हडपसर), अनमोल चरणसिंग शिकलकर (वय 23 वर्षे, राहणार नाशिक रोड, सिन्नर फाटा सिकलकर वस्ती) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्स या सराफ दुकानाचे शटर उचकटून काही जणांनी रविवारी पहाटे (ता.१) सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. जाताना सेक्युरिटी कामगार आणि स्वच्छता कर्मचारी यांना चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली होती. याप्रकरणी संतोष सिताराम सहदेव ऊर्फ वर्मा (वय ५७ वर्ष, रा. गुंजाळ हॉस्पिटल, माणिक नगर ता. जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तात्काळ वेगवेगळे ठिकाणी रवाना केली होती. सराफा बाजारातील दुकान फोडण्यापूर्वी आरोपींनी नाशिक मधून मारुती इको कार चोरली होती. चोरीच्या कारमधून नगरमध्ये येऊन सराफा बाजारातील दुकान फोडले. अहमदनगर, गंगापूर, वैजापूर या मार्गे चोरटे पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून लक्षात आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. येवल्या नजीक रस्त्याच्या कडेला मारुती इको कार (MH १५ GR १२०३) कोतवाली पोलिसांना आढळून आली. तो परिसर कोतवाली पोलिसांनी पिंजून काढला. दरम्यान, कोतवाली पोलिसांना खाबऱ्यामार्फत माहिती मिळाली की गुन्हा केलेले दोन आरोपी मुंबई कडे पळून जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या वर्णनावरून ट्रेन ची माहिती काढून दोघांना नाशिक येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी इतर सहा साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
    अटक आरोपींकडून ४२.७९० ग्रॅम चोरी गेलेले सोन्याचे दागिने आणि सोने विक्रीचे ९१,००० रू रोख रक्कम असा ३,३४,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
    पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विश्वास भान्सी पुढील तपास करीत आहेत.
    पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि विश्वास भान्सी, पोसई प्रविण पाटील, पोसई गजेंद्र इंगळे, अंमलदार तनविर शेख, गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना सलिम शेख, शाहीद शेख, इस्राईल पठाण, ए. पी इनामदार, अमोल गाढे, संदिप थोरात, अभय कदम, सोमनाथ राउत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, कैलास शिरसाठ, सतिश शिंदे तसेच दक्षीण मोबाईल सेलचे राहुल गुंड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

    आरोपी नामे अक्षयसिंग बिरूसिंग जुन्नी याचे वर दाखल असलेल्या गुन्हे खालील प्रमाणे.
    हडपसर पोलीस स्टेशन
    1) 1003/2021 भादवी क354, 354,427,504 प्रमाणे
    2) 212/2022 भादवी कलम 326 324 504
    3) 632 2022 भादवी 324, 323,504,506 प्रमाणे
    4) 647/2022 भादवि क 379, 34 प्रमाणे
    5) 766/2022 भादवी क 454, 457,380 प्रमाणे
    6)788/2022 भादवी क 454, 457,380 प्रमाणे
    7)791/2022 भादवी क 454, 457,380 प्रमाणे
    8)890/2022 भादवी क 379 प्रमाणे
    9)893/2022 भादवी क 379 प्रमाणे
    10) 899/2022 भादवी क 379 प्रमाणे
    11) 940/2022 भादवी क 379 प्रमाणे
    12) 1135/2023 भादवि क 324 504 506
    13) वानवडी पो स्टे 271/ 2023 भादवि कलम 454, 457,380 प्रमाणे

    #ahmednagar #crime #ahmednagar #newsupdate #newstoday24ahmednagar #police #ahmednagar #newsupdate
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ समाजातल्या गुंडांचा बंदोबस्त करा ; अहमदनगरच्या एसपींकडे निवेदनाद्वारे मागणी
    Next Article अहमदनगर ब्रेकींग : एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अँटीकरप्शनच्या जाळ्यात
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे हटवणार

    February 12, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.