भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिनानिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना आ.संग्राम जगताप
आ.संग्राम जगताप: युवा पिढीच्या उज्वल भविष्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी
नगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शहरामध्ये पूर्णाकृती पुतळा उभा राहत असून हा पुतळा देशामधील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बसविलेला आहे. त्यांचीच प्रतिकृती या ठिकाणी बसविण्यात येणार आहे. याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. अनेक वर्षांच्या संघर्षा नंतर या कामाला यश आले आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला नेहमीच प्रेरित राहत असतात त्यांच्या विचाराने आपण सर्वजण काम करत असून, युवा पिढीच्या उज्वल भविष्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिनानिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना आमदार संग्राम जगताप व आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यावेळी प्रा.माणिकराव विधाते, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, विजय गव्हाळे,परिमल निकम, इंजि. केतन क्षीरसागर,अजय साळवे, शशिकांत नजन, संजय सपकाळ, कौशल्य गायकवाड, साहेबराव विधाते आदी उपस्तित होते