Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»Ahmednagar | विरोधकांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले : नगरसेवक कुमारसिंह वाकळे
    Ahmednagar

    Ahmednagar | विरोधकांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले : नगरसेवक कुमारसिंह वाकळे

    newstoday24By newstoday24December 26, 2023Updated:December 26, 2023No Comments4 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून बोल्हेगाव पोलीस कॉलनी परिसरातील रस्ता  काँक्रिटीकरण  कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न

    विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून कुमारसिंह वाकळे यांची ओळख – आ. संग्राम जगताप

    नगर : बोल्हेगावच्या ग्रामीण भागाला विकास कामातून उपनगराची ओळख निर्माण करून दिली असून शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे विकास कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असते त्यासाठी पाठपुराव्याची खरी गरज असुन कुमारसिंह वाकळे यांची पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून ओळख निर्माण झाली आहे.  राज्य सरकारच्या माध्यमातून सावेडी बोल्हेगाव रस्ता रुंदीकरणासाठी तसेच सीना नदीवरील पुलाच्या कामासाठी निधी प्राप्त झाला आहे, लवकरच हे कामही मार्गी लागणार आहे या भागातील मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लागत असल्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. या भागाच्या विकास कामाचे सर्व श्रेय नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांना जाते असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
    प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून पोलीस कॉलनी परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, शहर अभियंता मनोज पारखे, साधना बोरूडे,रजनी अमोदकर,योगिता थोरात,पुनम मरकड, दिपाली वाघ, प्रणिता शिंदे,गौरी निकम,अनिता पगारे,मोहीनी भोसले,रूपाली सोनवणे,अंजली खेंडके,अंबिका घोलप,पुनम सुदर्शन बनसोडे,सचिन शेकटकर,श्रीराम मरकड,गोविंद नन्नवरे,सुधिर दौंडे,अनिल गायकवाड, सुमंत जाधव,बच्चू काते,निवृत्ती ऊंडे,जिवन पगार,रमेश वाकळे,अनिल भोसले,दगडु जाधव,अक्षय लबडे,भाऊसाहेब देशमुख, दिपक साळवे,प्रशांत देठे,रवी जाधव,भिमा धोत्रे, भिमा साळवे,आण्णा धोत्रे,विलास लटपटे,किशोर गांगर्डे, बाप्पू धाकतोडे,प्रकाश नाईक,रावसाहेब खेडेकर,संतोष वाटमोडे,रमेश वाकळे,नवनाथ कोलते,राजेंद्र लोखंडे,रशिद शेख,मल्हारी कांबळे,अन्सार इनामदार,प्रकाश धाडगे,विलास कांबळे,असिफ पठाण,समिर पटेल,फिरोज शेख, केशव कोळेकर,जालिंदर घोलप,सुभाष पिसोरे,अशोक भडके,आशिष गायकवाड,पंकज लोखंडे,सुभाष निक्रड, दीपक धोत्रे,रशिद शेख,डॉ लालासाहेब पाचपुते,रवी सानप,सुनिल ठोंबरे,अमोल राजगुरू,अरूण माळी,सुदाम गावडे, डॉ द्वारकानाथ पेरणे,अतुल राठोड,बाळासाहेब शेळके,अकबर शेख,सुरेश पवळे,मोहन गाडे, निरंजन मनाळ,बाळासाहेब रोंगे,दादासाहेब बडे ,विनोद गायकवाड,मनोज परदेशी,कलीम शेख,योगेश साळवे,लखन गायकवाड,अमीत गायकवाड,विकी देठे,अभिजित पाटोळे,प्रवीण माळी,पिंटुभाऊ गायकवाड,प्रशांत माळी,साहील शेख,गणेश पिसोरे,अरबाज शेख,अभिजित पाटोळे,यश नेटके,अभिजित गायकवाड,अमोल सोनवणे,आदीत्य गेरंगे,सुजित ठोंबरे,आयाज शेख,निखिल आंधळे,सार्थक भोसले,राजेंद्र लांडगे,जीवन पगार,हनुमंत मुटकुळे,शुभम जाधव ,भालचंद्र पाटील,हबीब शेख,दास गायकवाड,संतोष गेरंगे,धनंजय वाघ आदी उपस्थित होते,
    नगरसेवक कुमारसिंह वाकळे म्हणाले की, बोल्हेगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत चांगले काम करत असतात, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकास कामांची प्रेरणा मिळाली आहे, पोलीस कॉलनी परिसरातील नागरिक विविध प्रश्नांना सामोरे जात होते मात्र त्यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मला दिली व मी गेल्या दहा वर्षांमध्ये या भागाचा विकास कामांतून कायापालट केला आहे बोल्हेगाव नंदनवन नगर,कांती चौक येथील मुख्य व अंतर्गत रोडचे कॉक्रीटीकरण, बोल्हेगाव महालक्ष्मी नगर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथील मुख्य रोडचे कॉक्रीटीकरण, बोल्हेगाव साळवे नगर शिव मल्हार चौक येथील मुख्य व अंतर्गत रोडचे कॉक्रीटीकरणाचे काम पुर्ण केले असून या भागातील सर्व प्रश्न मार्गी लावून पुढील वीस वर्ष या भागात कुठलेही काम करण्याची गरज भासणार नाही असे ते म्हणाले.
          राजेंद्र लांडगे म्हणाले की, पोलीस कॉलनी परिसरात मध्ये लाईट, पाणी, रस्ते, ड्रेनेज आधी स्वरूपाचे प्रश्न गंभीर होते. कुमारसिंह वाकळे यांनी या भागाचे विकास कामातून नंदनवन केले आहे. विकास कामातून या परिसराला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले असल्यामुळे आता आम्हाला शहरांमध्ये राहिल्यासारखे वाटत आहे, नगरसेवक  कुमारसिंह वाकळे यांनी नागरिकांना विकास कामाच्या माध्यमातून वाढदिवसाची भेट दिली आहे, आमदार संग्राम जगताप व नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी विकास कामाच्या माध्यमातून जनतेचे प्रेम मिळवले आहे असे ते म्हणाले.
      चौकट : बोल्हेगाव परिसरातील नागरिक विकास कामांचे स्वागत सण, उत्सव याप्रमाणे करतात 
    बोल्हेगाव परिसरामध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या माध्यमातून विकासाची कामे मार्गी लागत असताना या कामांचा लोकार्पण सोहळा एखाद्या सण उत्सवाप्रमाणे होत असतो, वाढदिवस साजरे करीत असताना प्रत्येकाने सामाजिक कर्तव्य पार पाडले पाहिजे, नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत जनतेला रस्ता काँक्रिटीकरण्याच्या माध्यमातून भेट दिली आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले
     चौकट : विरोधकांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले

        आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आम्ही विकासाची सर्व कामे पूर्ण करत आहोत मात्र विरोधकांकडे कुठलेही काम नसल्यामुळे ते फक्त टीका करतात जे नगरसेवक होऊ शकत नाही त्यांना आता आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत पण त्यांना पहिल्यांदा आमच्याशी सामना करावा लागेल, जनतेनेही विकास कामे करण्यासाठी पाठीमागे उभे राहावं, भूलथापांना बळी पडू नका, जनतेचा विकास जनतेच्या हातात आहे जो विकासाची कामे करेल त्याच्या पाठीमागे उभे राहावे असे मत नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी व्यक्त केले.

    #ahmednagar #ahmednagar #newsupdate #kotwalipolice #nagarpolice #newstoday24ahmednagar #newstoday24ahmednagar #कुमारवाकळे
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर शहरात पुन्हा एकदा खुनी हल्ला…केडगाव रंगोली हॉटेलच्या समोर वकील चावला यांच्यावर खुनी हल्ला
    Next Article Ahmednagar I तातडीने पथदिवे बसविले नाही तर तीव्र आंदोलन करू – नगरसेवक रामदास आंधळे
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे हटवणार

    February 12, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.