राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा जाळून निषेध
जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम भक्तांची जाहीर माफी मागावी : वैभव ढाकणे
अहमदनगर प्रतिनिधी : शिर्डी येथे झालेल्या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधाना मुळे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय श्री रामाच्या घोषणा देत आव्हाडांचा फोटो जाळत निषेध नोंदवला. यावेळी विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकने , संभाजी पवार , दीपक नवलानी, महावीर कांकारीया, भैय्या भांडेकर, देवेंद्र भटेजा,आकाश चोपडा,लालूशेठ किथानी, नितीन पुरुस्वामी, अनिकेत चव्हाण, राधे दांगट, निलेश कदम, राहुल नेटके ,सागर विधाते, ऋषी विधाते,कुणाल म्हस्के,ओम भिंगारदिवे , रोहन ठोंबरे,, ऋषिकेश बागल, ओमकार थोरात,अनमोल वाडेकर, ओंकार आव्हाड , संकेत झोडगे , भैय्या पांढरे , दिनेश लंगोटे,भाऊ वणवे,कृष्णा शेळके, नारायण आव्हाड, शुभम नंगाळ, तुषार भोस, चंद्रकांत काळाने,संकेत भोरे,यश शिंदे. आदी उपस्थित होते
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे म्हणाले की धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली व स्वतःला कायम प्रसिद्धी झोतात ठेवण्यासाठी हिंदूंच्या भावना दुखावतील असं नेहमीच वादग्रस्त वक्तव्य हिंदूंच्या देव देवतांच्या विरोधात वाचाळवीर जितेंद्र आव्हाड गरळ ओकत असतात . धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदू ,मुस्लिम ,ख्रिश्चन, शिख, ईसाई अशा सर्वच धर्माच्या देवदेवतांचा आदर केला पाहिजे पण शरदचंद्रजी पवार यांच्यासमोरच असं बेताल वक्तव्य आव्हाड यांनी केलेल आहे शरदचंद्र पवार यांनी त्यांची हकालपट्टी करावी व आव्हाड यांनी श्रीराम भक्तांची जाहीर माफी मागावी.