जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा अन्यथा कायदा हातात घेऊ – नागरदेवळे ग्रामस्थांचा इशारा
नगर : शहराजवळील नागरदेवळे येथे विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत येथील स्थानिक हिंदू मुस्लिम लोक पूर्वीपासून एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होऊन एकमेकांच्या सणासुदीला एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आपापले धार्मिक कार्य करत आलेले आहेत. परंतु काही दिवसांपासून बाहेरून आलेले समाजकंटक या सलोख्याच्या वातावरणात विष कालवण्याचे प्रयत्न करत आहेत त्यातून हिंदू धर्माच्या धार्मिक कार्यक्रमावेळी अडथळा निर्माण करणे, मुलींची छेडछाड करणे हनुमान चालीसा हिंदू देवतांची आरती या मध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना दमदाटी करणे किंवा त्यांचा दहशत बसेल अशा पद्धतीने पाठलाग करणे असे प्रकार अलीकडच्या काळात वाढत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य , महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा अन्यथा कायदा हातात घेऊ असा इशारा अलका दळवी, ज्योती कदम, शितल पुंड, रवी तुपे, रवी धाडगे यांनी दिला
या पूर्वी देखील तिसगाव येथील हिंदू मुलींचे छेडछाड प्रकरण उंबरे येथील हिंदू मुलींना धर्मांतरण करण्याचा प्रयत्न तसेच गुहा येथील कानिफनाथ देवस्थान येथे मुस्लिम धर्मांधांनी केलेले अतिक्रमण अशा प्रकरणात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनीच जातीने लक्ष घालून संबंधित पीडितांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली त्यामुळे जिल्हाभरातून हिंदू धर्मीय तरुणांना कर्डिले यांच्या रूपाने आशेचा किरण दिसत आहे. त्यामुळे गावातील सुमारे ४०० महिला व ५०० तरुणांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेतली व होत असलेल्या अन्यायाबाबत दाद मागितली.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ताबडतोब जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला ,भिंगार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांना फोन करून सदर माहिती दिली यानंतर लगेचच भिंगार पोलीस स्टेशनचे पीआय मुंडे स्वतः दाखल झाले, त्यांच्या समक्ष गावातील महिलांनी तसेच तरुणांनी होत असलेल्या प्रकाराचा पाढा वाचला.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सदर प्रकार न थांबल्यास व संबंधितावर कारवाई न झाल्यास यापुढे नागरिकांच्या संरक्षणार्थ आम्हाला स्वतःला मैदानात उतरावे लागेल व कायदा हातात घेऊन आमच्या पद्धतीने या समाजकंटकांचा बंदोबस्त करावा लागेल तत्पूर्वी पोलीस प्रशासनाने या प्रकारांवर आळा घालावा व सदर व्यक्तींवर कठोर कारवाई करावी असा इशारा दिला.
यावेळी पोलीस प्रशासनाने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर येणाऱ्या सर्वच बातम्या खऱ्या असतात असे नाही त्यामुळे कोणीही भयभीत न होता असा काही प्रकार लक्षात आल्यास वेळीच प्रशासनाला माहिती द्यावी अशा समाजकंटकावर वेळीच कार्यवाही करून पुढील अनर्थ टाळता येतील.कोणत्याही धार्मिक तक्रारीची सखोल चौकशी केल्याशिवाय कोणावरही निरर्थक कारवाई होणार नाही व कोणाचीही नावे निरर्थक गोवण्यात येणार नाहीत त्यामुळे नागरिकांनी भयभित होऊ नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.