अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी माजी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांची निवड
नगर : अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी माजी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांना मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शहराचे आ. संग्राम जगताप, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आ. माणिकराव कोकाटे, आ. शेखर निकम, आ. नितीन पवार, आ. किरण सरनाईक आदी उपस्थित होते
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामाच्या माध्यमातून तरुणांची चांगली फळी उभी केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट झाला असून पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष पदी युवक चेहरा म्हणून संपत बारस्कर यांची निवड केली आहे ते पक्ष संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेवटचे घटकापर्यंत घेऊन जातील असे ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरणे समाजामध्ये रुजविण्याचे काम संपत बारस्कर करतील त्यांच्या नगरसेवक पदाचा अनुभव पक्ष वाढीसाठी नक्कीच होईल असे ते म्हणाले
नूतन शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले की. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून माझ्यावर पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी दिली असून ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल, पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे ध्येय धोरण जनतेपर्यंतघेऊन जाण्याचे काम केले जाईल असे ते म्हणाले
चौकट : संपत बारस्कर यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महापालिकेच्या गटनेतेपदी काम केले याचबरोबर त्यांनी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काम करीत असताना शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठविला. स्थायी समिती सदस्य पदाच्या माध्यमातून शहरातील विकासाच्या प्रश्नांना गती देण्याचे काम केले आहे त्यांच्या नगरसेवक पदाच्या अनुभवाचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना वाढीसाठी नक्कीच होईल असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.