Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»India»Bigg Boss 17 Winner : Munawar Faruqui बिग बॉस १७ च्या विजेत्याची घोषणा; मुनव्वर फारुकीने कोरलं ट्रॉफीवर नाव!
    India

    Bigg Boss 17 Winner : Munawar Faruqui बिग बॉस १७ च्या विजेत्याची घोषणा; मुनव्वर फारुकीने कोरलं ट्रॉफीवर नाव!

    newstoday24By newstoday24January 28, 2024Updated:January 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई: गेल्यावर्षी १५ ऑक्टोबर रोजी सुरू झालेला ‘बिग बॉस १७’चा खेळ २८ जानेवारी रोजी संपला. गेले तीन महिने बिग बॉस १७ च्या घरात मोठा ड्रामा पाहायला मिळाला आणि आता अखेरीस या पर्वाचा विजेता घोषित करण्यात आला आहे. या पर्वात टॉप ५ मध्ये पोहोचलेल्या आघाडीच्या स्पर्धकांमधून विजेता मिळाला असून या स्पर्धकाचे चाहते आनंदोत्सव साजरा करत आहेत. बिग बॉस १७ ची चमकती ट्रॉफी आणि मोठी रक्कम घेऊन आज हा स्पर्धक घरी जाणार आहे.

    कॉमेडियन मुनव्वर फारुकी बिग बॉस १७ चा विजेता ठरला आहे. पहिल्या दिवसापासूनच अत्यत हुशारीने खेळणारा आणि मोठा चाहतावर्ग असणारा हा स्पर्धक आज BB17 ची ट्रॉफी घेऊन जात आहे. बिग बॉस १७ च्या फायनलिस्टबद्दल बोलायचे झाल्यास मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अरुण माशेट्टी, अभिषेक कुमार आणि मन्नारा चोप्रा हे स्पर्धक टॉप ५ मध्ये पोहोचले होते. त्याआधी टॉप ६ मध्ये अंकिताचा नवरा विकी जैनही पोहोचलेला. मात्र प्रेक्षकांच्या मतांअभावी त्याला घराबाहेर जावे लागले. त्यानंतर २८ जानेवारी रोजी बिग बॉसच्या या नवीन पर्वाला विजेता मिळाला आहे.

    दरम्यान आजच्या सोहळ्याबद्दल सांगायचे झाल्यास टॉप ५ स्पर्धकांसह बिग बॉस १७ चे सर्व स्पर्धक सहभागी झाले होते. केवळ अनुराग डोभाल, खानजादी आणि ऑरा हे तीन स्पर्धक ग्रँड फिनाले सोहळ्यात दिसले नाहीत. अगदी काहीच दिवसांपूर्वी अनुरागने असा आरोप केलेला की, बिग बॉसचा हा खेळ आधीपासूनच फिक्स आहे. शिवाय त्याने ट्विटरवरही या खेळाबद्दल नाराजी व्यक्त करत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते.

     

    #MunawarFaruqui #bigboss #newstoday24ahmednagar
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर : अखेर तो मुलगा मिळाला… मुलांशी संवाद साधा, त्यांच्याशी प्रेमाने वागा नाहीतर होईल ‘पश्चाताप’
    Next Article अहमदनगर ब्रेकिंग : नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे हटवणार

    February 12, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.