अहमदनगर : स्टेट बँक चौक अतिक्रमणाच्या विळख्यात ; वाहतूक शाखेच्या थांब्यावर अतिक्रमणाचा ताबा
अतिक्रमण ताबडतोब काढण्याची मनपा आयुक्तांकडे स्थानिक नागरिकांची निवेदनातून मागणी
नगर : शहरात ताबेमारीचे आरोप एकमेकांवर सुरु असतानाच स्टेट बँक चौक येथील वाहतूक शाखेच्या थांब्यावरच ताबा मारत एका व्यावसायिकाने टपरी उभारून दुकानच थाटले आहे, स्टेट बँक चौक भागातील जनरल पोस्ट ऑफिसच्या भिंती शेजारी अवैधरित्या अतिक्रमणे करुन रोडला अडथळा होत असून वाहतुकीची समस्या निर्माण होत असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे, याचबरोबर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला उभे राहण्यासाठी असलेल्या चौकीवर देखील काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करत आपले दुकान ठरल्याचे पाहायला मिळत आहे, तरी मनपा प्रशासनाने येथील सर्व अतिक्रमणांवर कारवाई करावी जेणेकरून येथील रस्त्यांना मोकळा श्वास घेता येईल आणि येथील वाहतूक देखील सुरळीत होईल,
पोस्ट ऑफिसच्या भिंती शेजारी महामार्ग आहे व येथे मोठया प्रमाणात टू व्हिलर, फोर व्हिल, एस.टी. बससे इ. प्रकारे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. येथील अतिक्रमणांमुळे मोठया प्रमाणात रहदारीला अडथळा निर्माण झालेला असुन कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्यांची शक्यता नाकारता येत नाही. व या टप-यामुळे पायी चालणा-या लोकांना सुध्दा मोठया प्रमाणात त्रास निर्माण झालेला आहे. तरी याची आपल्या कर्मचा-यामार्फत स्थळ पाहणी व चौकशी करून या ठिकाणी केलेल्या टप-या त्वरित काढण्यांत यावे, अतिक्रमण ताबडतोब काढण्यात यावी जेणे करून कोणत्याही प्रकारे अनाधिकृत प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे केली