ब्रेकिंग न्यूज : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
मुंबई : (Maharashtra Bhushan to Ashok Saraf) मराठी सिनेसृ्ष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे नाव सर्व परिचित. त्यांनी जे मराठी सृष्टीला सुवर्ण दिवस आणले तर विसरणे अशक्य आहे.
त्यांना महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या CMO ट्वीटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी लिहिले, “ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे