समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी पदी अजीम राजे यांची निवड…
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी पदी अजीम राजे यांची निवड करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांच्या हस्ते अजीम राजे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्दिकी, प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होंगाडे, प्रदेश महासचिव रऊप शेख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. अजीम राजे यांनी अहमदनगर शहरात समाजवादी पार्टीला बळकट करण्याचे काम केले आहे. तर सर्व समाजाच्या महिला व युवकांचे उत्तम प्रकारे संगठन करुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी पदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
अजीम राजे यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आजमी, प्रदेश महासचिव परवेज सिद्दिकी, प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होंगाडे, प्रदेश महासचिव रऊप शेख यांच्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.