sangram jagtap | पदाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करावे – आमदार संग्राम जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर
नगर – पदाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले पाहिजे, आपण या माध्यमातून पक्ष संघटना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम करू शकतो. प्रत्येकाने संघटनेसाठी वेळ काढून संघटन वाढीचे काम करावे. यामुळे भविष्यात जनसामान्यांना कोणतीही अडचण आली तरी ते पुन्हा तुमच्याकडे हक्काने यायला विसरत नाहीत. संघटना, पद हे केवळ नावापुरते न घेता आपल्या कार्याची दखल पक्ष तसेच सर्वसामान्यांनी घ्यायला हवी. आपण या कामाच्या माध्यमातून समाजात एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो. कायम सकारात्मक ऊर्जा घेऊन काम केल्याने निश्चितच त्याचे परिणामही चांगलेच मिळतात. समाजात वेगवेगळ्या दृष्टिकोन ठेवून काम करणारे अनेक जण आहेत. परंतु आपण फक्त समाजाच्या भल्याचा दृष्टिकोन समोर ठेवून कार्य केले पाहिजे. संघटना एक मोठे छत्र आहे, या छत्राखाली अनेक जण येतात – जातात परंतु संघटना ही कायम मोठी होत राहते. कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करावे. पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कार्याचा लेखाजोगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. शहरात राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेली विकासकामे देखील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जम्बो कार्यकारिणीची निवड शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज सावेडी भागातील माऊली सभागृह येथे पार पडली.
यावेळी नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रा. माणिकराव विधाते, मा. नगरसेवक कुमार सिंह वाकळे, डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अविनाश घुले, सुरेश बनसोडे, अभिजीत खोसे, वैभव ढाकणे, केतन क्षीरसागर, रेशमा आठरे, अंजली आव्हाड, साधना बोरुडे, उबेद शेख, अजिंक्य बोरकर, संजय सपकाळ, प्रा.अरविंद शिंदे, विजय गव्हाळे, आरिफ शेख, गजानन भांडवलकर, दिनेश जोशी, राजेश भालेराव, साहेबान जहागीरदार, ऋषी ताठे, जॉय लोखंडे, योगेश नेमाणे, अमित खामकर, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले की, शहरात विकास कामांचा वेग तसेच शहराच्या विकासाची दूरदृष्टी असलेले शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे अनेक तरुण येत असतात. आमदार संग्राम जगताप यांच्या कामाची शैली व प्रत्येक समस्या जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन होत असल्याने तरुणांसह शहरातील व्यापारी, नोकरदार, महिला वर्ग आ. जगताप यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत असतो. आ. जगताप यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात नगर शहराच्या विकासाचा दृष्टीकोन कधीही सोडला नाही. त्यामुळेच आज शहरात उड्डाणपूल तसेच शहरातील अनेक रस्ते कॉंक्रिटीकरण तसेच डांबरीकरण करून दर्जेदार बनवण्याचे काम पाहायला मिळते. आज आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आले असून या कार्यकारणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले जाईल.
यावेळी मंचावरील उपस्थित नेते व पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान राऊत यांनी तर आभार वैभव ढाकणे यांनी मानले.
चौकट –
आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्र एक नंबर असेल
दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी बोलताना म्हटले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे नगर शहरातील नूतन कार्यकारिणीने असे चांगले काम उभे करावे की आपल्या कामाचा नावलौकिक राज्यामध्ये घेतला जाईल. संपत बारस्कर यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. आता नव्या जबाबदारीतून ही संपत बारस्कर आपल्या कामाचा ठसा शहरात तसेच राज्यात उमठवितील यात शंका नाही असे मत आ. संग्राम जगताप यांनी केले.
चौकट –
राजकारणात काम करत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांला देखील न्याय देण्याचे काम करावे, पदावर काम करत असताना समाजाचे प्रश्न जाणून घेऊन काम करावे. कामाच्या माध्यमातून पदाला न्याय द्यावा मी शाखा प्रमुख पदापासून विविध पदांवर काम केले असून त्या पदाला न्याय देण्याचे काम केले असल्यामुळेच समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण होत असते. आ. संग्राम जगताप हे सर्वसमावेशक काम करत असून अनेकांच्या सुख दुःखात भक्कमपणे पाठीशी उभे राहण्याचे काम केले आहे. असे मत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी मांडले.