भिंगारमध्ये अवैध धंदे, दादागिरी, गुंडगिरी, दमदाटी, जीवघेणे हल्ले सुरु
पण मग नेमकं काय करताहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू
भिंगार मध्ये वाढली अवैध धंदे व गुन्हेगारीची गती ; कोणालाच नाही राहिली पोलिसांची भीती?
भिंगार मध्ये पत्त्त्यांचा क्लब चालवण्यास आदेशला कोणाचा आदेश?
आदेशच्या पत्त्त्यांच्या क्लबमध्ये मतीन शेखवर प्राणघातक हल्ला
हि जीवघेणा हल्ल्याची घटना घडली त्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी कारवाई करणे का टाळले?
भिंगार पोलिसाचे आणि पत्त्यांचा क्लब चालवणाऱ्या त्या आदेशाचे काही आर्थिक हितसंबंध तर नाही ना?
तसेच या आदेशला भिंगार पोलिसांचा आशीर्वाद आहे का?
अहमदनगर मधील भिंगार मध्ये अवैध धंदे आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे भिंगार कॅम्प पोलिसांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. अहमदनगर मध्ये गेल्या एक दीड वर्षांपासून गुन्हेगारीच्या घटनात मोठी वाढ होत आहे , तसेच या ठिकाणी अवैध धंद्यातून अनेक गुन्हे घडल्याचे समोर आले आहे वादावादी, शिवीगाळ, हाणामारी, आणि हाणामारीचे रूपांतर जीवघेणे हल्ल्यात होत असल्याचे अनेक प्रकार पाहायला मिळाले, त्यातून हल्लेखोरांची दहशत वारंवार वाढत चालली असल्याचे दिसून येत असून आता अशा घटना अहमदनगर मधील भिंगार परिसरात देखील मोठ्या प्रमाणात होत आहे,
अहमदनगर शहरासह भिंगार परिसरात अनेक दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भिंगार परिसरात जुगार अड्डे, वरली मटका, बिंगो, हातभट्टी, अवैध देशी विदेशी दारूविक्री पत्त्यांचे क्लब असे अवैध धंदे खुलेआम जोमात असून गुंड प्रवृत्तीचे लोक देखील येथे गुंडगिरी आणि दहशत करत सर्व सामान्य जनतेत भीती निर्माण करत आहे, सध्या तर भिंगारची ओळख हि अवैध धंद्यांचे माहेर घर अशी झालीये, विविध प्रकारचे अवैध धंदे भिंगार मध्ये मोठ्या प्रमाणात सुरु असून भिंगार कॅम्प पोलिस करतात काय ? अवैध धंदेवाल्याना पोलिसांचे भय फक्त नावालाच का ? अवैध धंदे चालकांची दादागिरी, गुंडगिरी, दमदाटी यामुळे भिंगार मध्ये पोलिसांचा वाचक आहे कि नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे, भिंगार मध्ये दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असून मद्यपींची संख्या देखील वाढत आहे, या मद्यपींमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून मद्यपींचा अनेक मुली महिला यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,
भिंगार शहरात अनेक खुनी हल्ले, वेळप्रसंगी खून, चोऱ्या , दरोडे अशा भीतीदायक घटना घडत आहेत. भिंगार मध्ये आदेश भिंगारदिवे हा पत्त्त्यांचा मोठा क्लब चालवत असून त्याच्या याच पत्त्यांच्या क्लबवर नुकताच मतीन शेख या व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करत प्राणघातक हल्ला देखील झाला असून त्यातील जखमी रुग्णालयात उपचार सुरु आहे, मात्र दुसरीकडे ज्या आदेशाच्या पत्त्यांच्या क्लबमध्ये हि जीवघेणा हल्ल्याची घटना घडली त्या क्लबवर पोलिसांनी कारवाई करणे का टाळले ? भिंगार पोलिसाचे आणि पत्त्यांचा क्लब चालवणाऱ्या त्या आदेशाचे काही आर्थिक हितसंबंध जोपासले जात आहे का? तसेच या आदेशला भिंगार पोलिसांचा आशीर्वाद आहे का? भिंगार मध्ये पत्त्त्यांचा क्लब चालवण्यास आदेशला कोणाचा आदेश? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहत आहे,
भिंगारमध्ये असे गैरप्रकार सर्रास सुरु असून यातून परिसरात शांतता भाग तर होतच आहे पण येथील नागरिक सुरक्षित आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे, भिंगार शहर व परिसरात अनेक गुंडांनी दहशत माजवली आहे. अनेक खुनी हल्ले या ठिकाणी होत आहेत. मात्र गुन्हेगारीवर वचक बसवणे, गुन्हेगारांवर कारवाई करणे हि मोठी जबाबदारी असलेले भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहा.. पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू आणि त्यांचे सहकारी पोलीस करतात तरी काय ? भिंगार मधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीकडे भिंगार कॅम्प पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळेच अवैध व्यावसायिक कोणालाही न घाबरता बिनधास्त आपले अवैध धंद्याची दुकाने थाटत आहे, तसेच पोलिसांचे आणि अवैध धंदेवाल्यांचे आर्थिक हितसंबंध तर नाहीत ना ? तसेच वाढत्या अवैध धंदे आणि गुन्हेगारीकडे भिंगार पोलिसांचे फक्त दुर्लक्षच झाले नाही तर अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा भिंगारवासियांमध्ये सुरु आहे, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोजच अवैध धंदे चालत असून त्यातून गुन्हेगारीच्या घटना देखील सातत्याने घडत आहे.
संपादक : आफताब मन्सूर शेख