श्री गुरु माऊली संगीत विद्यालय अ.नगर आयोजित “मेरी आवाज ही पहचान है..
नगर : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने , रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सावेडी येथील माऊली सभागृहामध्ये “मेरी आवाज ही पहचान है” या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय, अ’नगर यांनी आयोजित केलेला असून निर्मिती सहाय्यक श्री चंद्रकांत पंडित यांचे आहे. नगरमधीलच नामांकित गायक – गायिका लतादीदींची गाजलेली काही गाणी सादर करणार आहेत. प्रसिद्ध निवेदक श्री आनंद देशमुख पुणे यांचे निवेदन असणार आहे. नगरमधील अनेक मान्यवर गायक , वादक कलाकार यात सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क खुला असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजक आणि श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या संचालिका गायिका सौ.वर्षा पंडित यांनी केले आहे.