केडगाव शास्त्रीनगर दत्त मंदिर परिसरातील सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न
स्वच्छ सुंदर व हरित केडगाव निर्माण करण्यासाठी काम सुरू – उद्योजक सचिन कोतकर
नगर : केडगाव परिसरातील नागरिकांनी नेहमीच विकास कामांचे स्वागत केले आहे, माजी महापौर संदीप कोतकर यांनी विकासाच्या योजना काय असतात हे प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे, खा. डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची कामे मार्गी लावली आहेत. त्यांना आपण सर्वजण मतदानरुपी आशीर्वाद देणार आहे केडगाव उपनगराचे नियोजनबद्ध व दर्जेदार विकासाची कामे सुरू असून नागरिकांनी देखील सहभागी व्हावे, माजी नगरसेवक मनोज कोतकर व जालिंदर कोतकर यांनी विकासाची कामे मंजूर करून आणण्यासाठी पाठपुरावा करत आहे कोतकर कुटुंबियांनी केडगाव मध्ये केलेले विकास कामांची आजही चर्चा होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे, केडगावकरांना बरोबर घेऊन सामाजिक धार्मिक व विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत, स्वच्छ सुंदर व हरित केडगाव निर्माण करण्यासाठी काम सुरू आहे असे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले,
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून व सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर यांच्या पाठपुराव्यातून केडगाव शास्त्रीनगर दत्त मंदिर परिसरातील सुशोभीकरण कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी माजी सभापती मनोज कोतकर, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर, माजी सभापती लताताई शेळके, माजी नगरसेविका गौरी नन्नवरे, गणेश नन्नवरे, अशोक कराळे, ह भ प रामदास क्षिरसागर महाराज, नंदू ओहोळ, शिवाजी पळसकर,बहिरू कोतकर, अजित कोतकर, सुमित लोंढे, भरत ठुबे, सोनू घेबुड, बाबासाहेब कोतकर, राजेंद्र घुले, सुधाकर बोरुडे, बच्चन कोतकर, बाबुराव लोखंडे, विमल पवा, पोपट कराळे, विशाल भिंगारदिवे, अनिल ठुबे, ईश्वर नवसुपे महाराज, योगेश अल्हाट, नवनाथ मासाळ आदी उपस्थित होते,
मनोज कोतकर म्हणाले की, केडगावकरांच्या विकास कामासाठी सर्वांनी एकत्रित येऊन चांगले काम उभे राहत आहे, उद्योजक सचिन कोतकर यांनी सर्वांना सोबत घेऊन भानुदास कोतकर व माजी महापौर संदीप कोतकर यांच्या कामाची धुरा सांभाळत केडगावच्या विकास कामाला चालना देत आहे, एकीच्या बळावर चांगल्या कामाची निर्मिती होत असते तरी केडगावकरांना चांगले काम कारण्याऱ्यांच्या मागे उभे राहावे असे ते म्हणाले,
जालिंदर कोतकर म्हणाले की, केडगावच्या नागरिकांवर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे विशेष प्रेम असून त्यांनी विविध विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच अध्यात्मिकता व धार्मिकता वाढविण्यासाठी 11 मंदिरांसमोर सभामंडपाचे काम उभे राहावे यासाठी निधी दिला असून ते काम सुरु आहे, याचबरोबर 200 के व्ही चे ५ ट्रांसफार्मर मंजूर केले असून त्याचे काम देखील सुरू आहे याचबरोबर बंद पाईपगटार, रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण व सुशोभीकरणासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे असे ते म्हणाले,
ह भ प क्षीरसागर महाराज म्हणाले की, धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकवटला जात असतो, भानुदास कोतकर यांनी विकास कामातून केडगावची घडी बसवली होती ती घडी अशीच सुरू राहावी यासाठी सचिन कोतकर यांनी प्रलंबित विकासाची कामे मार्गी लावावी . माजी महापौर संदीप कोतकर यांनी केडगावकरांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावल्याने त्यांच्या कामाची नागरिकांमध्ये नेहमीच प्रशंसा होत राहील असे ते म्हणाले,