खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मॉडेल कॉलनी येथील ओपन स्पेस शुशोभीकरण व आसरा व हरिप्रिया कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न.
शहर विकासाच्या कामाचे श्रेय भाजपालाच – अभय आगरकर
नगर : शहरामध्ये विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदाच नगर शहरासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एवढा मोठा निधी मिळाला असल्यामुळेच विकास कामाचे श्रेय भाजपालाच जात आहे. मात्र महापालिकेत मागील काळामध्ये सत्ता नसल्यामुळे शहराचा विकासाचा समतोल राखला गेला नाही. सत्ताधाऱ्यांनी आप-अपल्या भागामध्येच कामे केले आहे. मॉडेल कॉलनी येथील ओपन स्पेस शुशोभीकरण कामाच्या माध्यमातून परिसराला सौंदर्य प्राप्त होईल दर्जेदार कामाच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो. त्यामुळे विकासाची कामे होत असताना चांगली कामे निर्माण करा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामाच्या माध्यमातून आत्मनिर्भर व विकसित भारत निर्माण केला आहे. केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केले.
खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मॉडेल कॉलनी येथील ओपन स्पेस शुशोभीकरण व आसरा व हरिप्रिया कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मा.नगरसेवक रामदास आंधळे, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे, विवेक नाईक, माजी नगरसेविका संगीता खरमाळे, माजी नगरसेवक नितीन शेलार, संपत नलवडे, सामाजिक कार्यकर्ते अमित गटणे,बापू जानवे, वंदना पंडित, नितीन मोरे, प्रभाकर गवांदे, आदी सह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते अमित गटणे म्हणाले की, प्रभाग क्र.४ मधील मॉडेल कॉलनी येथील ओपन स्पेस शुशोभीकरण डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या निधी प्राप्त झाला आहे तसेच आसरा व हरिप्रिया कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण काम मार्गी लागणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ.सुजय विखे पाटील यांना प्रशासकीय कामाचा दीर्घ अनुभव असल्यामुळेच नगर शहराच्या विकास कामासाठी विविध विभागाच्या माध्यमातून निधी प्राप्त होत आहे. त्या माध्यमातून प्र.क्र.४ च्या विकास कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे असे ते म्हणाले.

यावेळी मा.नगरसेवक रामदास आंधळे, नितीन शेलार, संपत नलवडे, आदींची भाषणे यावेळी झाली.