नगर शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये पोलीसांची गस्त वाढवावी, मनसे विद्यार्थी सेनेची पोलिस अधिक्षक यांच्या कडे मागणी.
अन्यथा मनसे स्टाईल ने रोड रोमियोंचा बंदोबस्त करू – अखिल चित्रे
नगर : सध्या शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. महाविद्यालय परीसरात बाहेरील काही गावगुंड आणी रोड रोमियो विदयार्थ्यांना त्रासदायक ठरत असल्याचे वारंवार समोर आले आहे. शहरातील राधाबाई काळे महाविद्यालय, पेमराज सारडा महाविद्यालय, नगर महाविद्यालय, न्यु आर्ट्स महाविद्यालय या परिसरात छेडछाडीच्या घटना वाढत असल्याची आमच्याकडे अनेक तक्रारी आहेत. पोलीस प्रशासनाचा धाक या वृत्तीच्या लोकांना असणं गरजेचे आहे. यासाठी महाविदयालय परिसरात गस्त वाढवणे आवश्यक असल्याचे मत विद्यार्थ्यांकडूनच व्यक्त केले जात आहे. यावर आपण तात्काळ निर्णय घ्यावा त्याच बरोबर महाविदयालयांमधे देखील काही समाज विघातक व्यक्ती काम करत असल्याचे कोपरगाव या ठिकाणी घडलेल्या घटनेतून दिसून आले. कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन महाविद्यालयातील विद्याथ्यांना बळजबरीने नमाज पढण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले होते. यातुन हिंदू विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या ही बाब तेथील कर्मचाऱ्यांनीच उघडकीस आणली होती हा प्रकार करणारी मंडळी केरळ मधुन आलेले असल्याची माहीती समोर अलिली आहे. यावरून देशविरोधी आणि समाज विघातक कारवाई या बाहेरून आलेल्या लोकांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. अशा सर्व घटनांवर लक्ष देण्यासाठी पोलीस प्रशासनाची मोठी मदत व्हवी म्हणून तात्काळ महाविद्यालयीन परिसरात गस्त वाढवून महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासना बाबत विश्वास वाढावा म्हणुन पाउल उचलवेत अन्यथा मनसे स्टाईल ने रोड रोमियोंचा बंदोबस्त करू अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस अखिल चित्रे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड , उत्तर जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे, विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष संकेत जरे , प्रमोद ठाकूर, प्रमोद जाधव, अनिकेत शियाळ, आदिनाथ पुंड,प्रवीण गायकवाड,भागवत रोमन, ओंकार काळे,अभिषेक कलमदाणे,विभाग अध्यक्ष किरण रोकडे आदी उपस्थित होते.