बोल्हेगाव संभाजीनगर येथे स्थायी समितीचे मा.सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून परमपरमेश्वर महादेव मंदिर येथील काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न.
कुमारसिंह वाकळे यांच्या कामाच्या माध्यमातून बोल्हेगाव – नागापूर भागाला वेगळी ओळख निर्माण झाली आहे – आ.संग्राम जगताप
नगर : शहरातील डीपी रस्ते पूर्वी फक्त नकाशावरती दिसत होते. मात्र मी ते रस्ते प्रत्यक्षात उतरून दळणवळणासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे उपनगरांच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या कामाच्या माध्यमातून बोल्हेगाव – नागापूर भागाला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. विकासाच्या कामा एवढेच धार्मिकतेला तितकेच महत्त्व असून महाराष्ट्राला लाभलेली संत महंतांची परंपरा अखंडित पणे सुरू राहण्यासाठी आजच्या युवकांना अध्यात्मिकतेचे धडे दिले जाणे गरजेचे आहे. या माध्यमातून त्यांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळत असते. नियोजनबद्ध, कायमस्वरूपी व दर्जेदार विकास हाच आमचा अजिंठा असून तो आम्ही प्रत्यक्षात उतरवीत आहोत.विकास कामांमुळे नवनवीन कॉलनीची निर्मिती होताना दिसत आहे. या भागातील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले जात आहे. आज महिला दिनानिमित्त संभाजीनगर मधील महिलांचा गौरव करण्यात आला आहे महिला या आपल्या कुटुंबाला घडविण्याचे काम करत असतात. पुरुषाच्या यशाच्या पाठीमागे महिलांचा सिंहाचा वाटा असतो असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
बोल्हेगाव संभाजीनगर येथे स्थायी समितीचे मा. सभापती कुमार सिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून परमपरमेश्वर महादेव मंदिर येथील काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला . यावेळी स्थायी समितीचे मा. सभापती कुमारसिंह वाकळे,मा. नगरसेवक राजेश कातोरे, अमोल लगड,साधना बोरुडे, वैशाली अंकुश ,रजनी अमोद्कर ,शामलाल तिवारी, शंकर कड, विलास जाधव, अक्षय दुधाळ, विजय खरात, गणेश भडके, अनिल शिंदे, ऋषी कराळे, महेश कराळे, अनिल अनप, मयूर भांबरे, अशोक सवरे, रोहिदास चकाले, शंकर शिंदे, वैभव फाळके, महेश फाळके, रघुनाथ ढाकणे, लांडगे साहेब, रोहित शिंदे, राहुल शिंदे, विनय आगेलु, गणेश पाटील, केदारनाथ तोतला, निलेश सोले, रामनाथ बडे, विराज सोनकुसरे, तनपुरे साहेब, उंडे साहेब, सुरेंद्र सांगवा, धनराज डाडर, राम अनभुले, राम काळपांडे, अशोक गायकवाड, रामेश्वर गंधारे,जगन्नाथ दुधाळ, शरद शेलार, यश जाधव, राहुल सामृत, कुंदन कुमार, आर्यन वैरागर, घनश्याम कावरे, अर्चना जाधव, शीतल अनाप, स्वाती शिंदे, प्रियांका शिंदे, प्रतिभा दुधाळ, स्वाती सोनकुसरे, अश्विनी जाधव, अनुष्का भांबरे, प्रिया समृत, राणी पांचाळ, स्वाती डाडर, प्रज्ञा खरात, जया बडे, पूजा फाळके, आरती फाळके, प्रभावती तनपुरे, स्वाती फुगारे, सविता सावरे, राजश्री लवांडे, पूनम बारटक्के, श्रध्दा उंडे, लता कड, शुभांगी लांडगे, राणी ढाकणे, वंदना अहिरे,रेश्मा भडके, विकी तिवारी,दिलिप राख,नरेंद्र मिसाळ,नंदु वाकळे,सदाशिव कोलते,पवन चाफे,सुनिल भालेराव,रमेश वाकळे,पंकज वाकळे,करन वाकळे,नवनाथ कोलते,अक्षय वाटमोडे,सचिन वाकळे,जिवन पगार,हबीब शेख,बाळशिराम पावडे,राजेंद्र कराळे,सुभाष बर्डे,विलास ससे उत्तम वाकळे,रावसाहेब वाटमोडे,नवनाथ मदने,अक्षय दुधाळ,विलास जाधव,नानासाहेब आढाव,अशोक गवांदे,दीपक राजापुरे,नवनाथ वाकळे,अशोक गवांदे,श्रीराज मेणे,महेश लांडगे,गणेश पाटील,वसंत राठोड,संतोष वाटमोडे,अशोक बहीर,संदिप काळनर,गोरक्षनाथ तोडमल आदि उपस्थीत होते.
स्थायी समिती मा.सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले की, बोल्हेगाव – नागापूर परिसराच्या सर्वांगीण विकासाचे काम सुरू आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन काम केले असल्यामुळेच विकास कामातून ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातूनच जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत. प्रभागांमध्ये मंदिर तिथे सभामंडप व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहेत. आजच्या पिढीला धार्मिक संस्काराची खरी गरज असून आपल्या मुला मुलींना मंदिरात घेऊन जाण्याचे काम केले पाहिजे त्या माध्यमातून आपल्या घरामध्ये संस्कार धर्म पाळला जातो समाजामध्ये काम करीत असताना चांगल्या कामाच्या माध्यमातून मनाला आनंद होत असतो. नव्याने विकसित होणाऱ्या भागाचा नियोजनबद्ध कामे केले असल्यामुळेच विकासाची कामे दिसू लागले आहे. विकास हा कागदावर न ठेवता प्रत्यक्षात अमलात आणला असल्याचे ते म्हणाले.
चौकट : बोल्हेगाव मधील संभाजीनगर हा परिसर प्रभाग क्रमांक आठ मध्ये येत असून या भागाच्या विकास कामाकडे नगरसेवकांनी अक्षरशा पाठ फिरवली होती आम्हाला पाण्यासाठी वन वन करावी लागत होती सर्वत्र अंधाराचे व घाणीचे साम्राज्य पसरले होते मात्र आम्ही सर्व महिलांनी स्थायी समितीचे मा.सभापती कुमारसिह वाकळे यांची भेट घेऊन प्रश्नांचा पाढाच वाचला व त्यांनी या भागाचे नगरसेवक नसतानाही आम्हाला टप्प्याटप्प्याने विकासाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या व संभाजीनगर परिसराला अंधारातून प्रकाशात आणण्याचे काम केले आहे. तसेच महिलांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लावला असून ते या परिसरातील महिलांचे भाऊ म्हणून ओळखले जात आहे. अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली आहे.