नगर मनपातील जलअभियंता परिमल निकम यांना शासनाचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आ. संग्राम जगताप यांच्या वतीने सत्कार संपन्न
पुरस्कारामुळे जल अभियंता परिमल निकम यांची जबाबदारी वाढली – आ. संग्राम जगताप
अहमदनगर : राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार अहमदनगर शहरातील महानगरपालिकेतील जल अभियंता परिमल निकम यांना जाहीर झाल्याबद्दल आ. संग्राम जगताप यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, मा.नगरसेवक बाळासाहेब पवार, अभिजित खोसे, वैभव ढाकणे, सुमित गायकवाड, पप्पू पाटील, सिद्धार्थ आढाव, समीर भिंगारदिवे, येशुदास वाघमारे, विशाल भिंगारदिवे, कौशल गायकवाड, सुभाष वाघमारे, सागर गुंजाळ, विशाल बेलपवार, बाबा कदम, निखील गहिले, दीपक मराठे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महापालिकेचे जल अभियंता परिमल निकम यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शहराच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे, आता त्यांच्यावर या पुरस्कारामुळे मोठी जबाबदारी पडली असून त्यांनी समाजातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी चांगले काम उभे करावे असे ते म्हणाले.