बोल्हेगाव श्रीदत्तनगर येथे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न
नागरिकांशी सततच्या संवादामुळे विकासाची प्रश्न मार्गी – मा. सभापती कुमारसिंह वाकळे
नगर : बोल्हेगाव नागपूर परिसरातील नागरिकांची सतत ठेवलेल्या संवाद व गाठीभेटीमुळे प्रभागातील प्रश्न माहिती होऊन जलद गतीने सोडवण्यासाठी मदत होत असते, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे मार्गी लावली असल्यामुळे दिवसेंदिवस नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे त्यांना मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावून देण्यासाठी प्रयत्न करत आहे, नागरिकांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न प्राधान्यक्रमाने हाती घेऊन सोडविला जातो त्यामुळे नागरिक देखील समाधान व्यक्त करत असतात. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील प्रभागातील विकासाची कामे मार्गी लावली जात आहे या कामासाठी आ. संग्राम जगताप यांचे योगदान लाभत असते, प्रभागांमध्ये नियोजनबद्ध विकासकामे व्हावी यासाठी सर्वात प्रथम जमिनी अंतर्गत पाईपलाईनची कामे मार्ग लावली जात असून त्यानंतर रस्ता कॉंक्रिटीकरण व डांबरीकरणाची कामे हाती घेतली जात आहे त्यामुळे एकदा केलेली विकास कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येत नाही असे प्रतिपादन स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केले.
बोल्हेगाव श्रीदत्तनगर येथे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, दरम्यान नागरिकांच्या वतीने कुमारसिंह वाकळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी नाथाभाऊ वाटमोडे, रामा काते, निशांत क्षेत्रे, सोमनाथ धोंडे, सुधाकर डुकरे, दुर्गेश कुटे, सागर वाघ, अक्षय सोपादंडी, राहुल यादव, सचिन कदम, दिलीप दळवी, विलास दासार, चैतन्य ससे, संजय सत्रे, अरुण पवार, आशिष बोर्डे, सागर साळे, किरण बनसोडे, विशाल तांबे, योगेश पवार, मच्छिंद्र पवार, राम निंबाळकर, महादेव भोले, सुधीर जगताप आदी उपस्थित होते
चौकट : बोल्हेगाव गावठाण परिसरामध्ये श्री दत्तनगर कॉलनीची निर्मिती झाली, या ठिकाणी आम्ही सर्व रहिवासी राहण्यासाठी आलो असता पाण्याची गैरसोय निर्माण झाली होती मात्र आम्ही स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने पाणी योजना मंजूर करून काम पूर्ण केले व आमचा पाणीप्रश्न मार्गी लावला असे मत या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले.