रामवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न
नगर शहर विकासासाठी राज्य शासनाकडून सुमारे १६५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. संग्राम जगताप यांचा रामवाडी नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार संपन्न
कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध – आ. संग्राम जगताप
नगर : याप्रसंगी आ.जगताप यांनी सांगितले कि, काही दिवसांपूर्वीरामवाडी येथील नागरी समस्यांबाबत निलेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील युवा कार्यकर्त्यांनी नागरी समस्या बाबत निवेदन दिले होते. त्यानुसार तात्काळ मनपाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन परिसरातील पाहणी करण्याचे सांगितले त्यानंतर समक्ष परिसरात भेट देत समस्यांची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या त्यानंतर मनपा प्रशासनाला तात्काळ विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या, व तातडीने नव्याने गटार, काँक्रीटीकरण रस्ते, समाज मंदिराची व सभामंडप ची कामे हाती घेतली, सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासाची कामे घेऊन गेलो, शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे, शहराच्या मूलभूत प्रश्नांपासूनची कामे देखील मलाच करावी लागत आहे यासाठी मी सक्षम असून कष्टकऱ्यांच्या देखील पाठीमागे उभा आहे रामवाडी परिसरातील चारी बाजूने रस्त्यांची जाळे निर्माण केले आहे, रामवाडीतील अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, या कामांसाठी निलेश म्हसे व प्रकाश वाघमारे यांनी मोठा पाठपुरावा केला त्यानंतर तातडीने विकास कामांना देखील सुरुवात केली, आपल्या सर्वांना एकत्र येऊन शहर विकासाची कामे मागील लावायची असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले
रामवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला दरम्यान नगर शहर विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. संग्राम जगताप यांचा रामवाडी नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे पाटील,सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते सचिन जगताप, सागर मुर्तडकर, प्रकाश वाघमारे, सागर साठे, सतीश साळवे, सुरेश वैरागर, दीपक सरोदे, दीपक साबळे, अश्विन खुडे, संकेत लोखंडे, पप्पू पाथरे, गणेश ससाने, राजू कांबळे, दीपक लोखंडे, बंटी साबळे, मयूर चखाले, अजय केंजरला आदी उपस्थित होते.
निलेश म्हसे पाटील म्हणाले की, रामवाडीतील विकासाचे मुलभूत प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होते, त्या प्रश्नांना नागरिक सामोरे जात होते, या भागात सातत्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता त्यामुळे नागरिकांना साथीच्या आजाराची लागण होत होती यांसह विविध समस्याचे साम्राज्य रामवाडीत असल्याचे आ. संग्राम जगताप यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तातडीने रामवाडीतील नागरी प्रश्नांची पाहणी केली आणि त्यानंतर या ठिकाणी विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने विकास कामांना सुरुवात झाली, आता या माध्यमातून रामवाडीचा चेहरामोहरा बदलेल असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रकाश वाघमारे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, शहर व रामवाडीच्या विकासासाठी आ. संग्राम जगताप यांनी मोठा निधी दिल्याने त्यांचा रामवाडी नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे भविष्यात देखील आ.संग्राम भैय्या जगताप यांचे सहकार्य लाभेल ही अपेक्षा व्यक्त केली.