आमदार निलेश लंके यांच्यावर पक्ष विरोधी कारवाई साठी आम्ही अभ्यास करत आहोत – सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्या पक्षांमध्ये पक्ष प्रवेश केला आहे आमदार लंके यांच्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला होता . आ . निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर बोलताना आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले आमदार निलेश लंके यांचा पक्षप्रवेश झाला असल्याचे आम्ही बातम्या पाहिल्या आहेत मात्र यावर आम्ही अभ्यास करत असून योग्य त्या वेळेस आ.निलेश लंके यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करू असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुंबईत पत्रकार परिषदेत म्हणाले. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी उपमख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधामध्ये दंड थोपटले असतानाच आ.निलेश लंके यांचं पक्ष विरोधी कार्य यावर सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले . विजय शिवतारे व आमदार निलेश लंके यांचे वक्तव्य हे स्क्रिप्टेड असून या स्क्रिप्ट मागील व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या जागा वाटप येणाऱ्या एक ते दोन दिवसात जाहीर होईल मात्र महाविकास आघाडीने आमच्या जागा वाटपाची काळजी करू नये त्यांच्यातील अंतर्गत वादावर अधिक लक्ष द्यावे असे सुनील तटकरे यावेळी म्हणाले.