सावेडी येथील श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान आयोजित संत संमेलन संपन्न
बाल वारकऱ्यांची पालखी मिरवणूक सावेडी गावातील नागरिकांचे आकर्षण ठरले
संतांचे आणि समाजाचे नाते हे माय लेकरासारखे आहे – हभप पुंडलिक महाराज जंगले शास्त्री
नगर : संतांचे आणि समाजाचे नाते हे माय लेकरासारखे आहे, संतांचे विचार समाजाला प्रेरणादायी असून संत समाजाच्या चुकीच्या गोष्टीवर बोलत असतात संतांनी समाजाला एकत्रित जोडले आहे त्यांनी कोणताही जातीभेद केलेला नाही, सध्या राजकारणासाठी समाजामध्ये जातिभेद वाढला असून द्वेष भेदही वाढला आहे, हिंदू धर्माची संस्कृती टिकून ठेवण्याचे काम संत महंतांनी केले आहे, त्यातून समाज जोडला आहे राजकारणी लोक समाज तोडण्याचे काम करत असून जर तुकडे झाले तर देश आराजकता निर्माण होईल, भारतीय संस्कृती प्रमाणे समाज एकत्र राहिल्यास सदगुणी समाज निर्माण होईल, संतांनी नेहमीच समाजातील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी काम केले आहे अंधश्रद्धेवर संतांनी घाला घातला आहे त्यातून समाज वाचवला आहे संतांच्या विचाराशिवाय पर्याय नाही त्यांच्या विचाराप्रमाणे जगणारा समाज उत्तम आहे समाज जोडण्याची ताकद संताशिवाय दुसऱ्या कोणत्ही नाही, पुढाऱ्यांच्या सभेतून समाजाला मिळते काय ? मात्र संतांच्या कीर्तनातून समाजाचे प्रबोधन होत असून आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचे काम होत असते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या माध्यमातून गेली २५ वर्ष सद्गुरु संत तुकाराम महाराज बिजेनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून समाजाला एकत्रित करण्याचे काम केले जात असल्याचे प्रतिपादन ह भ प पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांनी केले.
सावेडी येथील श्री सद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान व माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने आयोजित संत संमेलन संपन्न झाले यावेळी ह भ प पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, ह भ प साधनाताई सानप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, राजाभाऊ मुळे, प्रभाताई भोंग, अशोक वाकळे, बाळासाहेब वाकळे, शिवाजी चव्हाण, संदीप महाराज खोसे, पुष्कर कुलकर्णी, गोरक्षनाथ दुतारे, अशोक गायकवाड, सुधीर लांडगे, शिवाजी महाराज गरड, जया ताई कडलक, राधाकिसन कातोरे, रामदास क्षीरसागर, विठ्ठल भालके, तुकाराम चव्हाण, देविदास बारस्कर, ऋषिकेश खोसे महाराज, बाळासाहेब वाकळे,केशव ढोले आदीसह जिल्हाभरातील महाराज मोठ्या संख्येने उपस्थित होते राजाभाऊ मुळे म्हणाले की संत मंतांच्या विचारामुळे आपली महान संस्कृती टिकून आहे. नगर हे भक्ती मार्गाचे मुख्य ठिकाण आहे, संत संमेलनाच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होत असते, माझी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे मंदिर उभे करून समाजामध्ये त्यांच्या विचाराचा संदेश देण्याचे काम केले आहे असे ते म्हणाले,
माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, सावेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षापासून संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजन केले जात आहे, यामध्ये संत संमेलनाचे आयोजन केले जाते जिल्हाभरातील महाराजांना एकत्रित करण्याचे काम केले जात असून संमेलनाच्या माध्यमातून विचाराची देवाणघेवाण होत असते तसेच विविध विषयांवर चर्चासत्र संपन्न होते, सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये युवा पिढीला धार्मिकता व अध्यात्मिकतेचे धडे देणे गरजेचे आहे शहरी भागात संत संमेलनाचे आयोजन होणे गरजेचे असून यासाठी सावेडी गावात सात दिवस धार्मिकतेचा मोठा उत्सव पार पडत असतो. संत संमेलनानिमित्त सावेडी गावातून बाल वारकऱ्यांची पालखी दिंडी काढण्यात आली असून ग्रामस्थांचे आकर्षण ठरले आहे असे ते म्हणाले.