जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी व मा. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा निमित्त ह भ पऋषिकेश महाराज खोसे यांचे कीर्तन संपन्न.
सुखाचे अनेक भौतिक साधन प्राप्त असताना माणूस समाधान हरून बसलेला : ह भ पऋषिकेश महाराज खोसे.
सावेडीत अवतरले पंढरपूर..
नगर : जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान आयोजित भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताहात तिसऱ्या दिवसाची कीर्तनरुपी सेवा वारकरी सेवक ह भ प ऋषिकेश महाराज खोसे यांची घातला दुकानl देती आलीयासी दानll संत उदार उदार l भरले अनंत भांडारll या तुकोबारायांच्या चार चरणाच्या अभंगावर कीर्तन सेवा संपन्न झाली.. संतांच उदार त्व सांगत असताना. संत शिकवतात संत उपदेश करतात. संत सांभाळ करतात. नवे नवे अत्यंत दुःखाची निवृत्ती व परमानंद सुखाची प्राप्ती संत प्राप्त करून देतात. मानवी जीवनात एकीकडे भौतिक साधनाचा भौतिक सुखाचा आलेख उंचावत असताना मानवी जीवनातलं खरं समाधान आणि सुख निघून चाललंय, सुखाचे अनेक भौतिक साधन प्राप्त असताना माणूस समाधान हरून बसलेला आहे. त्याच्या जीवनात खरं समाधान खरं सुखरूप जीवन प्राप्त करायचा असेल तर संतांच्या विचाराची आपल्याला गरज आहे. संत विचार नुसती ऐकून किंवा वाचून आपल्याला समाधान प्राप्त होईल असं नाही पण संत सांगतील तसं आपण आचारण केलं, तर निश्चितच आपल्याला समाधानाने सुखरूपता प्राप्त होईल. विद्यादान हे दिल्याने वाढत असते ते कधीही कमी होत नाही.आज दिशाहीन होत असलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी वारकरी संप्रदाय कीर्तन परंपरा आणि संत विचार याशिवाय गत्यंतर नाही. त्यात महाराष्ट्र आहे शांत याला कारण महाराष्ट्रात आले आहेत संत. त्यांनी लिहिलेत ग्रंथ म्हणून त्याचा अंगीकार करून महाराष्ट्र आहे शांत. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगावर विवेचन करताना विचार सागर पंचदशी ज्ञानेश्वरी अनेक ग्रंथांचे पुरावे देऊन उपस्थितांचे लक्ष वेधून. संतांचा मोठा उपकार पांडुरंग परमात्मा संतांनी विटेवर उभा केला हे सांगत असताना पंढरपूरचे हुबेहूब वर्णन करून जणू काही सर्व भाविकांना आपण सावेडीत नसून जणू काही पंढरपुरात आहे ही प्रचिती आली. असे प्रतिपादन ह भ प ऋषिकेश महाराज खोसे यांनी केले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी व माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यानिमित्त ह भ पऋषिकेश महाराज खोसे यांचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी सदर कार्यक्रमास चाळीसहून अधिक कीर्तनकार प्रवचनकार याच बरोबर भरपूर जनसमुदाय उपस्थित होता. यात आयोजक मार्गदर्शक माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शिवाजी चव्हाण तसेच अनेक मान्यवर विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. सावेडी गावात गर्दीचा मोठा उच्चांक झाला होता.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी असून त्यांचे विचार आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे यासाठी सावेडी ग्रामस्थांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या बीजे निमित्त गेल्या पंचवीस वर्षापासूनअखंड हरिनाम सप्ताह आयोजन केले जात आहे या कार्यक्रमांमध्ये दररोज भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते, असे ते म्हणाले.