मा.आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन उद्योजक अनिल पोखरणा यांच्या हस्ते संपन्न झाले.
आपल्या माणसाच्या पाठीमागे उभे राहण्याची प्रेरणा मा.काकांच्या माध्यमातून मिळाली आहे – आ.संग्राम जगताप.
नगर : रक्तदान शिबिरे ही काळाची गरज बनली असून युवकांनी पुढे येऊन रक्तदान करावे. समाजामध्ये आपण वावरत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सकारात्मक भावनेतून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पडावे सध्याच्या काळामध्ये नागरिक विविध आजारपणांना सामोरे जात आहे. त्यासाठी रक्तसाठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे आहे. मा.आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वीस वर्षापासून ची रक्तदान शिबिराची परंपरा सुरू आहे. समाजामध्ये अडचणीच्या काळात मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे कोविड काळामध्ये रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला होता त्यावेळी आम्ही युवकांना आवाज दिल्यानंतर रक्तदानासाठी युवक धावून आले होते. रक्तदान चळवळ ही फोटोसेशन पुरती मर्यादित न ठेवता ती लोक चळवळ व्हावी यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. आपल्या माणसाच्या पाठीमागे उभे राहण्याची प्रेरणा मा.काकांच्या माध्यमातून मिळाली आहे.असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आधार कार्यालय येथे मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना उद्योजक अनिल पोखरणा समवेत आ.संग्राम जगताप, मा.उपमहापौर गणेश भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,मा.नगरसेवक अविनाश घुले,संजय चोपडा,अण्णासाहेब मुनोत,कमलेश भंडारी,विपुल शेटिया,डॉ.विजयकुमार भंडारी,प्रकाश भागानगरे,विजय गव्हाळे,संभाजी पवार,विशाल पवार,प्रा.माणिकराव विधाते,अभिजीत खोसे,संजय चोपडा,संतोष लांडे सुरेश बनसोडे वैभव ढाकणे संतोष ढाकणे अजय दिघे,दिलीप पवार,मोहन गुंजाळ,सागर गुंजाळ,किशोर पितळे,सारंग पंधाडे,नितीन पुंड,राजू एकाडे आदी उपस्थित होते.
अनिल पोखरणा म्हणाले की, मा.आमदार अरुणकाका जगताप यांनी नगर शहरांमध्ये सर्वांना बरोबर घेऊन काम करत असून सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात प्रत्येकाला आदरेची भावना दिली आहे असे ते म्हणाले.
संभाजी पवार म्हणाले की, युवकांच्या माध्यमातून चांगले काम उभे राहत असते. मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक,सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात रक्तदाते रक्तदान करत असतात. आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. असे ते म्हणाले.