अहमदपूर पोलीसांची मोठी कार्यवाही ; साडेचार लाखाची अवैद्य देशी विदेशी दारू जप्त
अहमदपूर : अहमदपूर येथील पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्या वर कार्यवाही करत अहमदपूर येथे विशेष पथकाने चार लाख ६८ हजार ४४० रुपयाची देशी व विदेशी दारू मुद्देमाला सह जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे विविध कलमान्वये उल्लंघन केल्याबद्दल आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिनाक ४ मे ५ मे च्या दरम्यान सहाय्यक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने ही कार्यवाही केली आहे. पोलीस स्टेशन अहमदपूर येथील प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल व त्यांचे डीबी पथकातील पोलीस नाईक तानाजी आरदवाड, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार डबेटवार, पोलीस कॉन्स्टेबल पाराजी पुठेवाड,, पोलीस कॉन्स्टेबल बापूराव धुळगुंडे ,पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कज्जेवाड यांनी कार्यवाही केली.