राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ बालिकाश्रम रोड परिसरात प्रचार फेरी संपन्न.
विकास कामांना नगरकरांचा पाठिंबा – आमदार संग्राम जगताप
नगर : शहरामध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकास कामांना प्राधान्यक्रम देत नागरिकांचे एक-एक प्रश्न हाती घेऊन नियोजनबद्ध शहर विकासाची कामे मार्गी लावली आहे. त्यामुळे नगरकरांचा विकास कामांना पाठिंबा राहील. खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी शहरातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे विकास कामातून विकसित नगर निर्माण होत आहे नगर-पुणे रेल्वे सेवेचे काम मार्गी लावण्यासाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा संसदेमध्ये पाठवायचे आहे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ बालिकाश्रम रोड परिसरात प्रचार फेरी संपन्न झाली यावेळी. आ.संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, धनश्री विखे पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा ताई आठरे,अविनाश घुले, दगडू मामा पवार, प्रा. माणिकराव विधाते, अभिजीत खोसे, प्रा.अरविंद शिंदे, डॉ.रणजीत सत्रे, वंदना ताठे, विलास ताठे, अजय दिघे, सचिन जगताप,अजिंक्य बोरकर,दीपक खेडकर,आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपत बारस्कर म्हणाले की, लोकसभा निवडणूक निमित्त महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ बालिकाश्रम रोड, भुतकरवाडी, भिंगारदिवे मळा, ताठे मळा या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रॅली काढत नागरिकांशी संवाद साधला आहे. यावेळी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत होते. आ.संग्राम जगताप यांनी शहरांमध्ये नागरिकांच्या सुखदुःखाबरोबरच विकासाची कामे मार्गी लावली असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना नगर शहरात मोठे मताधिक्के मिळणार आहे असे ते म्हणाले.
चौकट : प्रचार फेरी दरम्यान ठिकठिकाणी महिलांच्या वतीने मोठ्या उत्साहात आमदार संग्राम जगताप व धनश्री विखे पाटील यांचे स्वागत करत औक्षण केले जात होते.नागरिकांचा उत्साह पाहता नगरकर विकासाच्या कामाबरोबर राहतील असे मत शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी व्यक्त केले.
चौकट : नगर शहर विकास कामातून झपाट्याने बदलत असून महानगराकडे घेऊन जाण्यासाठी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायचे आहे केंद्रसरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ची वयोश्री योजना यशस्वीपणे राबवली आहे. याचबरोबर लिंक रोडचे काम मार्गी लावले असल्यामुळे शहर विस्तारीकरणाला चालना मिळणार आहे. अशी माहिती धनश्री विखे पाटील यांनी दिली.