पेठशिवणी येथे परीस स्पर्श फाउंडेशन द्वारा पाणपोईचे उद्घाटन
पेठशिवणी : पालम – तहानलेल्यांची तृष्णा भागविण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की सामजिक कार्याचे भान ठेऊन काही सामजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोया पूर्वी सुरू करत असत. परंतु अलीकडच्या काळात पाण्याचा व्यापार सुरू झाला आणि पाणपोईचा धर्म बाटलीबंद झाला.अन् समाजातील सहिष्णुता संपली की काय? म्हणूनच उन्हाळ्यात पाणपोया लुप्त होत आहेत.पेठशिवणी एक मोठी बाजारपेठ असल्यामुळे व लग्नसराई मुळे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते.
म्हणूनच पेठशिवणी बस स्टॉप येथे आज पालम तालुक्यातील पहिली पाणपोई परीस स्पर्श फाउंडेशन द्वारा उद्घाटन करण्यात आले.
पेठशिवणीतील तरुण एकत्र येऊन सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्यासाठी परीस स्पर्श फाउंडेशनच्या माध्यमातून कार्याला सुरुवात केली आहे. आज या कार्यक्रमाला गावातील जेष्ठ मंडळी, परिसरातील मंडळी, नवयुवक, गावकरी व परीस स्पर्श फाउंडेशनचे सर्व संचालक मंडळी उपस्थित होते.
अंकुश वाघमारे न्यूज 24 टुडे परभणी पालम