मुकिंदपुर (नेवासा फाटा) परिसरातील नागरिकांनी लोकसभेच्या मतदानावर टाकला बहिष्कार…
नेवासा तालुक्यातील मुकिंदपुर नेवासा फाटा परिसरातील शांतीनगर, तारापार्क, अंबाडे वसाहत श्रध्दा अपार्टमेंट्स, साईतेज कॉलनी येथील नागरिकांनी लोकसभेत सह येणाऱ्या सर्व निवडणुकांवर मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवात लोकसभेच्या मतदानापासून होणार आहे.असे नागरिकांनी सांगितले.तहसीलदार संजय बिरादार यांनी नेवासा फाटा परिसरातील शांतीनगर, तारापार्क, अंबाडे वसाहत श्रध्दा अपार्टमेंट्स, साईतेज कॉलनी या गट नंबर 79 व 80 मधील अतिक्रमण केलेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस काढलेली असतानाही अतिक्रमण न काढता तहसीलदार संजय बिरादार निघून गेल्याने नागरिकांत नाराजी पसरली.याचा जाब विचारण्यासाठी सर्व नागरिक तहसील येथे गेले असता तहसीलदार संजय बिरादार यांनी उडवा उडीची उत्तरे दिली.हा रस्ता लवकर मोकळा करून दिला नाही तर परिसरातील सर्व नागरिक नेवासा फाटा येथील नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येत्या दोन दिवसात रस्ता रोको उपोषण करण्यार आहे. यापुढील परिणामांची सर्व जबाबदारी तहसील व तहसीलदार संजय बिरादार यांची राहील.असा इशारा सुमन ठोंबरे, सुरेखा साळवे, लता लिहिणार, संगीता वंजारे, जया आगळे, मनीषा साळवे, शैला डिके सर्व महिला नागरिकांनी दिला आहे.