आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः टाकली मटका अड्ड्यावर धाड
पोलिस अधिकाऱ्यांना माहिती देवुन सुद्धा मटका अड्ड्यावर धाड टाकण्यास टाळाटाळ
कोळसा खदाणीमुळे वणी तालुक्याला ओळखले जाते. परंतु, आता वणी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहे. मटका, जुगार खुले आम सुरू असून, याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असा आरोप भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला. याबाबत वणी पोलिस आणि वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती देऊन दुर्लक्ष केले. त्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः मटका अड्ड्यावर धाड टाकून वणी पोलिसांची पोलखोल केली.दिवभर मजूर काम केल्यानंतर मटका जुगार खेळून पैसे हरतात. यामुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर येत आहे. आतातरी मटका जुगार बंद होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वणी यवतमाळ