पो. नि. धनंजय जाधवांमुळे नेवाशातील मतदान शांततेत आणि सुरळीत पार.
नेवासा – सध्या सुरू असलेल्या अठराव्या लोकसभेच्या मतदानासाठी चौथ्या टप्प्यातील मतदान शिर्डी लोकसभेसाठी नेवासा तालुक्यात 13 मे रोजी अतिशय शांततेत आणि सुरळीत वातावरणामध्ये पार पडले. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या चोख बंदोबस्तामुळे कुठल्याही प्रकारची गडबड आणि गोंधळ नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जाधव यांच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. सकाळी सात पासूनच संध्याकाळी सहा वाजेपर्यंत डोळ्यात तेल घालून नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि सर्व पोलीस कर्मचारी सर्व बुथवर पहारा देत होते, तसेच वेळोवेळी जाधव यांनी मतदारांना आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन करून मतदान व्यवस्थित पार पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे सर्वच स्तरातून जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.