डॉ. बा. ज. दाते प्रशालेचे १९८१ च्या इयत्ता दहावीतील मुलांमुलींच स्नेहसंमेलन
४३ वर्षांनंतर सवंगडी आले एकत्र
नातेपुते येथील डॉ. बा. ज. दाते प्रशालेतील १९८१ च्या दहावी बॅचच्या मुला-मुलींचा स्नेहमेळावा एम. पी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली राजवैभव सांस्कृतिक भवनात पार पडला. ४३ वर्षांनंतर दहावीच्या वर्गातील ७५ मुले-मुली आणि पंधरा शिक्षक एकत्र आले होते.प्रारंभी शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी एम. पी. कुलकर्णी, सुरेश वहीकर, चंदनमल जैन, एस. एम. ढोपे, एस. एन. डांगे, अरविंद पाठक, पुरुषोत्तम भरते, जयश्री पाठक, डी. आर. कुलकर्णी, किसन करमाळकर, महावीर वसगढेकर, सर्जेराव वाघ,किसन साळवे उपस्थित होते. प्रास्ताविक मुक्ता गोरे-शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील राऊत यांनी केले. यासाठी महेश शेटे, भैयासाहेब देशमुख, विजयकुमार गांधी, श्रेणिक दोशी, संजय पद्मन, संजय प्रेमचंद गांधी, संजय दोशी, महेश दीक्षित, राजू पिसे, बंडू चंकेश्वरा, मुक्ता गोरे, अनुराधा देशपांडे, विजया कवितके, चित्ररेखा बनसोडे, उर्मिला गटकुळ, सुनीता दळवी, आशा काळे, महादेव बरडकर, सुहास भांड, बशीर पठाण, हनुमंत रुपनवर, दयानंद लाळगे, दीपक उराडे आदींनी परिश्रम घेतले. अंताक्षरी स्पर्धेने स्नेहसंमेलनाची सांगता झाली.