चक्रीवादळामुळे वाडी रायताळ येथील शाळेचे अतोनात नुकसान.
रिसोड: तालुक्यातील वाडी रायताळ येथे संत ज्ञानेश्वर विद्यालय शाळा कार्यरत असून दिनांक 21 मे 2024 रोजी मंगळवार ला तीन चार वाजता च्या सुमारास आलेल्या अचानक सुसाट चक्रीवादळामुळे व वादळ वाऱ्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय वाडी राहताळ या शाळेच्या इमारतीवरील संपूर्ण टीन पत्रे लोखंडी अँगल, दरवाजे यांचे अतोनात नुकसान झाले शाळेवरील तीन पत्रे अँगल दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर जाऊन पडले त्यामुळे सदर तीन पत्रे व लोखंडी अँगल चे अक्षरशः चुराडा झाला सदर चक्रीवादळामुळे परिसरात अत्यंत भयभीत असे वातावरण निर्माण झाले होते, शाळेवरचे टीन पत्रे संपूर्ण उडाल्याने व काही भिंती सुद्धा पडल्याने शाळेचे अत्यंत नुकसान झाले आहे ,सदर शाळेच्या नुकसान नुकसानी संदर्भात व आलेल्या चक्रीवादळामुळे वाडी राहताळ शाळेच्या चक्रीवादळामुळे शाळेला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे,त्यामुळे प्रशासनाने व शिक्षण विभागाने सदर बाबीची गंभीर दखल घेऊन या शाळे च्या नुकसानीचा स्थळ पंचनामा करून व पाहणी करून शाळेला योग्य ती आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे सदर शाळा ही गावापासून थोड्या अंतरावर असून सुसज्ज इमारत व सुंदर असा परिसर या शाळेचा आहे त्या शाळेमध्ये आजूबाजूच्या दोन-तीन खेड्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळा सत्र सुरू होण्याअगोदर सदर शाळेची दुरुस्ती होणे गरजेचे आहे त्यामुळे प्रशासनाने व शिक्षण विभागाने सदर बाबीकडे त्वरित लक्ष घालून शाळा पूर्व स्तरावर आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.
न्यूज़ टुडे 24
प्रतिनिधी,फय्याज़ कुरेशी रिसोड