लाचखोरीमुळे महावितरणकडुन शेतकर्यांच्या व व्यवसायिकाच्या जीवाशी खेळ;
३३ केव्हीच्या लाईन शिप्टींगमध्ये मंजुरी केबलची असताना तारा ओढल्या; कालच्या चक्री वादळात ३३ केव्हीची पाच पोल जमीनदोस्त ;मोठी जीवीत हानी टळली.
अंबाजोगाई / प्रतिनिधी
शनिवारी सायंकाळी तालुक्यातील दहा गावाला चक्री वादळाने वेढले. यात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लाचखोरीमुळे महावितरणकडुन शेतकर्यांच्या व व्यवसायिकाच्या जीवाशी खेळ सुरु असुन ३३ केव्हीच्या लाईन शिप्टींगमध्ये मंजुरी केबलची असताना तारा ओढलेले पाच खांब कालच्या चक्री वादळात जमीनदोस्त झाले यात ; जीवीत हानी झाली नसली तरी महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसापासुन वीज पुरवठा खंडीत झाल्याणे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील अकरा शेतकर्यांनी गिरवलीच्या २२० केव्ही केंद्रातुन घाटनांदुर ३३ केव्ही केंद्राला जाणारी लाईनला पन्नास वर्षे पुर्ण झाले असुन ते कुमकुवत झाले आहेत.त्यामुळे ते केंव्हाही पडुन मोठा अपघात होईल अशा आशयाची तक्रार १५ डिसेंबर २३ रोजी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याकडे केली होती. पण कारवाई काहीच झाली नाही. कालच्या चक्री वादळात ही लाईन जमीन दोस्त झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
श्रीकर त्र्यंबकराव फड रा रामनगर नांदेड यांच्या पुस येथे ४८३ गटा मध्यें जमीन असुन या गटात पेट्रोल पंप होत असुन गटातुन ३३ केव्ही लाई रस्त्यालगत शिफ्ट करण्यासाठी ४ लाख रुपये महावितरण कडे भरले. शिप्टींग मंजुरी मध्ये केबल टाकायचे मंजुर असताना कनिष्ट अभियंता सतिश गुडे व वरीष्ट अभियंता कानडे यांनी 2 लाख ची लाचेची मागणी केली परंतु फड यांनी ती पुर्ण न केल्यामुळे कंत्राटदाराचा लाभ होईल याउद्देशाने दोन्ही अभियंत्यानी केबल ऐवजी तार ओढली. याची तक्रार सहव्यवस्थापकीय संचालक छत्रपती संभाजी नगर, मुख्य अभियंता लातुर, अधिक्षक अभियंता बीड व उर्जा मंत्री यांच्याकडे केली होती. त्यानंतर दोन्ही अभियंत्यांची चौकशी समिती नेमली. या समितीने दोन्ही अभियंत्यानी पदाचा गैरवापर करुन गुत्तेदाराचा फायदा होईल असे कृत्य केल्याचे दिसुन आल्याचा अहवाल दिला. यात तक्रारदाराच्या तक्ररीत तथ्य आढळुन आल्याणे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी २३ एप्रील रोजी दिलेल्या गोपनीय अहवालात कनिष्ट अभियंता सतिश गुडे, वरीष्ट अभियंता कानडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन विभागीय चौकशीअंती अंंतिम शिक्षा प्रस्तावीत करण्याकरिता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी असा आदेश महिनाभरापुर्वी दिला असतानाही संबधितांवर कार्यवाही झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लाचखोरीमुळे महावितरणकडुन शेतकर्यांच्या जीवाशी खेळ सुरु असुन
३३ केव्हीच्या लाईन शिप्टींगमध्ये मंजुरी केबलची असताना तारा ओढल्या आहेत. कालच्या चक्री वादळात ३३ केव्हीची पाच पोल जमीनदोस्त झाल्याने मोठी जीवीत हानी टळली आहे.
* दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न…
दोन्ही अभियंत्यावर काय कारवाई केली असे अधिक्षक अभियंता घुमे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे देऊन दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याणे या प्रकरणात संशय बळावला आहे.
लाचेची मागणी पुर्ण न केल्यानेच माझी फसवणुक…..
माझ्या व्यवसायिक जागेतील ३३ केव्ही लाईन शिफ्ट करण्यासाठी महावितरणच्या नियमाप्रमाणे चार लाख रुपये भरले आहेत. महावितरणकडुन दिलेल्या कोटेशन प्रमाणे पुर्तता केली आहे .मंजुरी केबल ची असताना तारा ओढल्या आहेत.व सुपरव्हिजन महावितरण ने करायचे असते ते जाणीवपूर्वक चुकीचे केले आहे. कालच्या चक्रीवादळात बेकायदेशीर असलेले तार पोल माझ्या जागेत वाकलेले आहेत. खरे तर तेथे नियमाप्रमाणे केबल असायला पाहिजे. माझ्या व्यवसायिक जागेत पेट्रोल पंपावर काम करणार्या मजुर जीवाशी गेले असते. याला कोण जवाबदार राहणार. महावितरण कडून सुपर विजन व्यवस्थित झाले नाही.म्हणुन माझी फसवणुक झाली आहे. श्रीकर त्र्यंबकराव फड, व्यवसायिक व शेतकरी, पुस.
*परवाच्या पावसातच वीजेचा करंट उतरला होता….
गेल्या तीन दिवसापासुन वीजेसह पावसाचा कहर सुरु असुन शिप्ट केलेल्या पोलमध्ये आमच्या जनावरांना करंट लागलेला आहे. त्यामुळे आमच्या सावधगिरीमुळे जीवी हानी झाली नाही. तसेच माझ्या शेतात पेरणीपुर्व मशागत सुरु होती त्यातच चक्री वादळ आल्याने शेतातील मजुरावर या तार व खांब कोसळले असते तर मोठी जीवीत हानी झाली असती…महावितरण कंपनीने माणसाला मारण्याचा ठेका घेतला आहे का? असा संतप्त सवाल शेतकरी चंद्रशेखर गौरशेटे यांनी केला आहे.