महाळंगी गावात विज पडुन दोघांचा मृत्यु
चाकुर तालुक्यातील महाळंगी गावात विज पडुन दोघांचा मृत्यु झाल्याची घटना आज दि.२६ ०५/२०२४,रविवार दुपारी ४ वाजता घडली आहे.
आज दुपारी चाकुर तालुक्यात वादळी वऱ्यांसह आवकाळी पावसाने झोडपले असून त्यात चाकुर तालुक्यातील महाळंगी गावात ओमशिवा लक्ष्मण शिंदे, वय ३५ / शिवाजी नारायण गोमचाळे, वय ३२ / या दोघांचा विज पडून मृत्यु झाला आहे तसेच गावातील झाडे उपसुन पडले तर घरावरील पत्रे देखिल उडुन गेल्याची माहिती किनगाव पोलीस स्टेशन ला मिळताच महाळंगी बिट अमलदार कोतवाड आणि ASI मुरुडकर हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील प्रक्रिया पोलीस करित आहेत.
News today 24 असलम शेख लातुर,