नातीला भेटण्या अगोदरच काळाने केला घात
रस्ता ओलांडताना गॅस टँकरने ८० वर्षीय पादचारी महीलेला चिरडले कायगांव येथे दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील जुने कायगांव येथे ८० वर्षांच्या आजीला गॅसच्या टँकरने चिरडल्याने पंधरा फूट रस्त्यावर मांसाचे तुकडे विखुरल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शांताबाई नामदेव गायकवाड (८०) राहणार ताड पिंपळगाव तालुका कन्नड ह्या २७ मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता आपल्या कायगांव येथील मुलगी मीराबाई सोमनाथ आढागळे व नातिकडे जात असताना जुने कायगांव येथे उतरून रस्ता ओलांडताना पुणे येथुन छत्रपती संभाजीनगर कडे जाणारा गॅस टँकर क्रमांक एम एच ०४ जे के ४१८० ने पादचारी आजीला धडक दिली आजी टँकरच्या चाकाखाली आल्याने शरीराचे अक्षरक्षाः तुकडे तुकडे झाले आजीला पंधरा ते वीस फुटांवर फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले नातीला भेटण्या अगोदरच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आजीचा मृतदेह रुग्णवाहिकेने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून वैद्यकीय अधिकारी डॉ सुदाम लगास यांनी शवविच्छेदन केले या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गॅस टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ श्रीकांत बर्डे हे करत आहे.
(प्रतिनिधीःविशाल जोशी गंगापूर)