९८% गुण मिळवत जोधाप्रसादजी मोदी विद्यालयाची कु. पालकर अस्मिता दहावी बोर्डाच्या परीक्षेत शाळेत सर्वप्रथम
६६ विद्यार्थ्यांपैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा एकूण निकाल ९६%
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याने विशेषतः अंबाजोगाई शहरातील विद्यार्थ्यांनी यावर्षी देखिल दहावीच्या निकालात सर्वप्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील आपल्या विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखल्याचे दिसून येत आहे. यावर्षी या विद्यालयाचा एकूण निकाल हा ९६% एवढा लागला आहे. जोधाप्रसादजी मोदी विद्यालतील अनेक विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत विविध विषयात घवघवीत असे यश प्राप्त केले आहे. यामध्ये विशेष प्रविण्यासह २१ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १४ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत १९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. ज्यामध्ये कु.पालकर अस्मिता श्रीकांत या विद्यार्थिनीने ९८.२०% गुण घेऊन विद्यालयात प्रथम तर कु.पठाण सायमा शादुल्ला हिने ८८.६०% त्याचबरोबर ८८% गुण मिळवत चि. देशमुख समर्थ सखाराम या विद्यार्थ्यांने विद्यालयातुन तृतीय क्रमांक मिळवला आहे. जोधाप्रसादजी मोदी विद्यालयातील एकूण ६६ विद्यार्थ्यांपैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर कु. पालकर अस्मिता श्रीराम या विद्यार्थिनीने इंग्रजी विषयात ९८ गुण तर मराठा विषयात ९५ गुण मिळवले आहेत. तसेच होके पूनम नारायण हिने हिंदी विषयात ९४ गुण तर देशमुख समर्थ सखाराम या विद्यार्थ्याने गणित विषयात ९८ गुण प्राप्त केले आहेत. महाविद्यालयातील सर्व यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांना त्याच्या घवघवीत यशाबद्दल संस्थापक राजकिशोर मोदी,प्रा डॉ बी आय खडकभावी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, मार्गदर्शक प्रा. डॉ डी एच थोरात, प्रा. वसंत चव्हाण, विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य चंद्रकांत गायकवाड, विभाग प्रमुख मीना सोनवणे, संस्थेचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.