शालांत परीक्षेत गोदावरी कुंकूंलोळ यो.कन्या विद्यालयाचे घवघवीत यश
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
मार्च २०२४ शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्रीमती गो.कु.यो.कन्या विद्यालयाचा एकूण निकाल ९९.६६ टक्के इतका लागला असून विद्यालयातील विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले असून – विद्यार्थिनीनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण घेऊन सन्मानाचे स्थान प्राप्त केले आहे. विद्यालयातील संयुक्ता दुर्गादास चौधरी, सावरी कैलास पुसकर,अंकिता रामलिंग घुले या विद्यार्थिनींनी शंभर टक्के गुण घेऊन उच्चांक प्राप्त केला आहे. विद्यालयातील २९९ विद्यार्थिनी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाल्या त्यातील २९८ यश प्राप्त केले आहे.६३ विद्यार्थिनींनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण तर २६ विद्यार्थिंनींनी संस्कृत विषयात शंभर गुण प्राप्त केले आहेत. विशेष प्राविण्यासह१८९,प्रथमश्रेणी ७० व्दितीय श्रेणी ३२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन यो.शि.संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापुरकर,पदाधिकारी जी.बी.व्यास,ॲड. जगदीश चौसाळकर, कमलाकर चौसाळकर,डॉ.शैलेष वैद्य,प्राचार्य भीमाशंकर शेटे,ॲड.कल्याणी विर्धे, प्रा.जयश्री देशपांडे,मुख्याध्यापिका एम.एस.कुलकर्णी, इतर पदाधिकारी शिक्षिका,शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी आदींनी केले आहे.