रस्ता ओलंडताना अज्ञात वाहनाची धडक बसुन महिला ठार
शनी शिंगणापूर रस्त्यावर अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची धावपळ झाली.
राहुरी तालूक्यातील गोटूंबे आखाडा येथे काल सायंकाळच्या दरम्यान रस्ता ओलांडत असताना एका महिलेला चारचाकी वाहन जोराची धडक देऊन पसार झाले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून संतप्त झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी आज दुपारी शनी शिंगणापूर रस्त्यावर अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची धावपळ झाली.
राहुरी तालूक्यातील राहुरी ते शनी शिंगणापूर रस्त्यावर गोटूंबे आखाडा येथे काल दि. २६ मे २०२४ रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान गयाबाई गंगाराम तमनर, वय ४२ वर्षे, या रस्ता ओलांडत होत्या. तेव्हा भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने गयाबाई तमनर यांना जोराची धडक दिली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता त्या मयत झाल्या. आज दि. २७ मे २०२४ दुपारी बारा वाजे दरम्यान त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी संतप्त झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी गयाबाई तमनर यांचा अंत्यविधी गोटूंबे आखाडा येथे शिंगणापूर रस्त्यावर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या वतीने प्रचंड आक्रोश व्यक्त करण्यात आला.
शनी शिंगणापूर रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने या रस्त्यावर कायमच अपघात होतात. गोटूंबे आखाडा येथे शनी शिंगणापूर रस्त्यावर गतीरोधक बसवावे. अशी मागणी गेल्या एक वर्षांपासून ग्रामस्थ करीत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी त्या ठिकाणी आतापर्यंत १० ते १२ जणांचा रस्ता अपघातात बळी गेला. त्यात काल सायंकाळी झालेल्या अपघातात गयाबाई तमनर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होऊन रस्तारोको आंदोलन करुन प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दोन दिवसात गतीरोधक बसविण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. दोन दिवसात गतीरोधक न झाल्यास जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून काढू, असा ईशारा यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला. याबाबत नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर गयाबाई तमनर यांचा अंत्यविधी गोटूंबे आखाडा येथील स्मशान भूमीत करण्यात आला.
यावेळी विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, अण्णासाहेब बाचकर, गणेश रहाणे, भरत पवार, दिपक लांबे, नंदुभाऊ हरिश्चंद्रे, दशरथ बोरकर, सुभाष शेटे, सुनील तनपूरे, दिपक पटारे, उमेश बाचकर, बबन बाचकर, रावसाहेब होडगर, रामदास नेटके, रविंद्र चौधरी, किरण तांबे, लक्ष्मण खेमनर, बापू पिसाळ, बाळू दाभाडे, गेणुभाऊ तोडमल, भागवत शेडगे, कृष्णा मुंडलीक, निलेश बिडगर, तबाजी बाचकर, शिवाजी पवार, कुंदन बाचकर आदि उपस्थित होते.
News Today 24 साठी राजेंद्र उंडे राहुरी