दहावीच्या परीक्षेत ज्ञानदीप स्कूल चा 100 टक्के निकाल. 11 विद्यार्थ्यांना 80 टक्के पेक्षा अधिक गुण
प्रतिनिधी- नेवासा
नेवासा येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल ची महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली. 11 विद्यार्थ्यांनी 80 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
सर्वाधिक गुण मिळवलेले विद्यार्थी मृणाली रामभाऊ थोरात (94.20%) तनिष्का धर्मेंद्र काकडे (92.60%) अस्मिता संभाजी पवार (89.80%) तन्वी जितेंद्र कुऱ्हे (88.40%) प्राची विष्णू उंद्रे (87.%)
मृणाली थोरात हीस सर्वाधिक गुण इंग्रजी (92 ) हिंदी (90 ) मराठी (91 ) समाजशास्त्र (97) तर तनिष्का काकडे हीस गणित (98) आणि विज्ञान (96) या विषयात सर्वाधिक गुण मिळवले आहेत.
या विद्यार्थ्यांचे मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयनदादा गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, विद्यालयाचे समन्वयक अनिल पिसाळ, प्राचार्य वैभव आढाव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना सतीश डिके, किशोर दरंदले, देवदत्त दरंदले, दिलीप सरोदे व मंजुश्री ढाकणे यांचे मार्गदर्शन लाभले.