स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत मिळवले नेत्रदीपक यश.
चि. समाधान जाधव व चि. आयुष बिडगर यांनी घेतले 100 पैकी 100 टक्के गुण .
अंबाजोगाई प्रतिनिधी :-
शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर शाळेच्या तब्बल 22 विद्यार्थ्यांनी विजयी घोडदौड करून शंभर टक्के निकालाची यशस्वी उज्वल परंपरा कायम राखली आहे. समाधान जाधव व आयुष बिडगर या दोन विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 %गुण घेऊन शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
शाळेतील एकूण 22 विद्यार्थी
विशेष योग्यता प्राप्त विद्यार्थी 20
प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी 2
80% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी 17
चि.अमित रामलिंग घुले 97.60%
कु.अनुप्रिता राहुल देशमुख 96.40%
चि.पवन नवनाथ भोजने 95.40%
कु.श्रद्धा विष्णुकांत बागवाले 94.40%
चि.रुद्र मुकुंद कुमठेकर 92% कु.कांचन कल्याण काळे 92%
चि.मयुरेश ओमप्रकाश कुलकर्णी 90%
चि. राजवीर लोमटे 90.20%
चि.पार्थ शिंदे 87.20%
चि. अजय फड 85%
कु. देशमुख सई 85%
चि. नोमन शेख 84%
चि. ओम आपेट 83%
चि. पुष्कर क्षीरसागर 80.80%
चि. प्रणव आपेट 80.20%
चि. अभिजित गिरी 79.20%
चि. चैतन्य टोले , चि. रितेश गाढवे, चि. अवधूत देशमुख ,चि. प्रणव उदावंत*चि. अथर्व लोढा* या विद्यार्थ्यांनी ही घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेचे सन्माननीय संतोष दादा कुलकर्णी संस्थेच्या सचिव तथा माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापिका स्वरूपाताई दिग्रसकर व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ सुरेखाताई सौ प्रज्ञाताई सौ निशिगंधाताई सौ बालिका ताई मुंडे सौ पूजा ताई गरड श्री काळे सर श्री व्यंकटेश गायकवाड सर या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे